उपमुख्यमंत्र्यांच्या ‘शास्त्रशुद्ध’ प्रश्नांमुळे शास्त्रज्ञ झाले चकीत

देशी गोवंशाच्या संशोधन केंद्रासाठी पाहणी करण्यासाठी आलेल्या अजितदादांना माहिती देण्याची जबाबदारी या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने यांच्यावर होती.
उपमुख्यमंत्र्यांच्या ‘शास्त्रशुद्ध’ प्रश्नांमुळे शास्त्रज्ञ झाले चकीत
Ajit PawarAgrowon

पुणे ः ‘एक हजार जनावरांपासून दहा टनी गोबर गॅस प्लॅन्ट (Gobar Gas Plant) तुम्ही तयार करताय; पण छोट्या शेतकऱ्यांना परवडणारा प्लॅन्ट किती खर्चाचा असतो, आधुनिक पद्धतीने उभारलेल्या गोठ्यात जुन्या लाकडाचा वापर का केला, नवीन गोठ्यात डोंगळे कसे, संकरित आणि देशी गायीच्या शेणखतात दर्जाविषयक फरक कोणता, थारपारकर (Tharparkar Cow) गोवंशाच्या गायीच्या तुपाचे (Cow Ghee ) वैशिष्ट्ये कोणते, असे नानाविध शास्त्रशुद्ध प्रश्न विचारणारे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा अभ्यास पाहून चकीत होणारे शास्त्रज्ञ..!

Ajit Pawar
ऊस हे आळशी लोकांचे नव्हे,तर कष्टकऱ्यांचे पीकः अजित पवार

हे दृष्य होते ‘गोधन’ प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकस्थळाचे. शुक्रवारी (ता. २७) प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रात्यक्षिके व देशी गोवंशाची भल्या सकाळी इतकी पाहणी बारकाईने पाहणी चालू केली की कृषी शास्त्रज्ञांचीही दमछाक झाली. देशी गोवंशाच्या संशोधन केंद्रासाठी पाहणी करण्यासाठी आलेल्या अजितदादांना माहिती देण्याची जबाबदारी या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने यांच्यावर होती. मुळात, दादांनी स्वतः लहानपणापासून देशी गायी व गोठ्याचे व्यवस्थापन केलेले असल्याने बारीकसारीक माहिती त्यांना होती. त्यामुळे कधी धाडधाड प्रश्न तर कधी मिश्किल टिप्पणी करीत तर कधी कौतुकाची थाप मारत उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोधन’मधील सर्व उपक्रमांची आस्थेने माहिती घेतली.

Ajit Pawar
दुधाचे दर वाढल्याने गायींच्या किमतीही वाढल्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘‘मला या विषयात आधीपासून आवड आहे. तुम्ही मला लवकर बोलवायला पाहिजे होते, मी येणार म्हणून तुम्ही इथे रेड कारपेट टाकले पण गोठ्यासाठी असलेल्या जमिनीचे लेव्हलिंग तुम्ही केलेले नाही. मला इथे बोलावण्यापूर्वी नीट तयारी करायला हवी होती. कारण, मी एकदा आलो की सर्व बारकाईने शास्त्रशुद्ध विचारत असतो,’’ असे उपमुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकले. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी ते प्रश्न विचारणार याचा अंदाज शास्त्रज्ञांना आला आणि घडलेही तसेच. गोबर गॅस, सौर प्रकल्प, देशी गोवंश, गोधनापासून तयार केलेली उत्पादने, गोठा व्यवस्थापन अशा सर्व ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि माहिती घेतली. देशी अंडी उत्पादनाच्या स्टॉलवर श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांना देशी अंड्यांचा भाव विचारला. ते म्हणाले की, ‘‘अरे ही देशी अंडी ग्राहकांना हवी असतात. पण लवकर उपलब्ध होत नाहीत. त्याच्या मार्केटिंगसाठी तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या केल्या पाहिजे..!’’ ही सूचना ऐकून विद्यार्थीही चकीत झाले.

तळमळीच्या सूचना आणि जिव्हाळ्याने संवाद

उपमुख्यमंत्र्यांनी तासभर फिरून सर्व उपक्रमांची सखोल माहिती घेतली. शेवटच्या टप्प्यात ते म्हणाले की, तुमचे संशोधन आणि प्रयत्न खूप चांगले आहेत. पण, अजून नीटनेटके करा. निधीची कुठे गरज पडतेय, काय करायला हवे हे एकदा सविस्तर बसून ठरवा आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. अजितदादा आपल्या रागाने नव्हे; तर तळमळीने सूचना करीत असल्याची जाणीव सर्व शास्त्रज्ञांना झाली. या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबातील कृषी शाखेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, गोपालक, शास्त्रज्ञ, महिला मजुरांशीही जिव्हाळ्याने संवाद साधला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com