Weather Update : निफाड हंगामातील निचांकी ८.५ अंशांवर

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : उत्तरेकडील थंड प्रवाह (Cold Wave) महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात किमान तापमानाचा (Minimum Temperature) पारा घसरला आहे. शुक्रवारी (ता. १८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे यंदाच्या हंगामातील निचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही थंडी (Cold Weather) पुढील तीन दिवस कायम राहण्याचे संकेत आहेत.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंडगार प्रवाहामुळे राज्यातही गारठा वाढू लागला आहे. ही थंडी पुढील तीन दिवस राहून त्यानंतर पुन्हा काहीशी कमी होण्याचे संकेत आहेत.

Weather Update
Weather Update : राज्यात गारठावाढीची शक्यता

उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात किमान तापमानात अचानक घट झाली आहे. निफाड बरोबरच धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. तर जळगावात तापमान १०.३ अंशावर असून, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद येथेही तापमान ११ अंशांच्या जवळपास आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान १२ ते २२ अंशांच्या आसपास आहे.

Weather Update
Weather Update : आजपासून थंडी वाढण्याची शक्यता

दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका असला तरी कोरडे व जोरदार वारे वाहत असल्याने काही भागात गारठा जाणवत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा २९ ते ३५ अंशांच्या आसपास कायम आहे. रत्नागिरी येथे कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १८) राज्यात निरभ्र आकाश, कोरड्या हवामानासह किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरात आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली रविवारपर्यंत (ता. २०) आणखी तीव्र होऊन, तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात विषूववृत्ताजवळ समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

गुरूवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.५ (११.२), नगर ३०.६ (११.४), जळगाव ३१.८ (१०.३), धुळे ३०.० (९.०), कोल्हापूर ३१.१ (१७.०), महाबळेश्वर २५.७(१२.०), नाशिक २९.६ (११.२), निफाड २९.२ (८.५), सांगली ३१.३(१५.५), सातारा २९.५(१५.२), सोलापूर ३३.६ (१६.४), सांताक्रूझ ३४.२(२२.२), डहाणू ३१.६ (१८.९), रत्नागिरी ३५.२ (२०.१), औरंगाबाद ३०.२ (११.४), नांदेड ३१.४ (१६.०), परभणी ३२.२ (१४.६), अकोला ३२.६ (१४.८), अमरावती ३२.६ (१३.८), बुलढाणा २९.४ (१४.२), ब्रह्मपूरी ३१.६ (१६.२), चंद्रपूर २९.४ (१६.४), गडचिरोली ३०.२(१३.९), गोंदिया ३०.२(१४.४), नागपूर ३१.५ (१४.१), वर्धा ३२.० (१६.०), वाशीम ३१.८ (१४.८), यवतमाळ ३२.० (१३.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com