Parbhani News : कर थकबाकीमुळे बीज परीक्षण अधिकारी कक्ष सील

महापालिकेचे वसुली पथक बीज परीक्षण प्रयोगशाळा येथे गेले असता मालमत्ताधारकाने थकीत कराच्या १० लाख ५७ हजार ५१४ रुपयांचा भरणा न केल्यामुळे नोटीस बजावण्‍यात आली.
Parbhani News
Parbhani NewsAgrowon

परभणी ः महानगरपालिकेच्या १० लाख ५७ हजार ५१४ रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे कृषी विभागअंतर्गत परभणी (Agricultural Department Parbhani) येथील जुना पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण (Seed testing) प्रयोगशाळेतील बीज परीक्षण अधिकारी कक्षास कुलूप लावून सील ठोकण्यात आले.

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) वसुली पथकाने सोमवारी (ता. २३) ही कारवाई केली. शासनाकडून निधी प्राप्त नसल्यामुळे कराचा भरणा करता येत नाही.

बीज परीक्षण अधिकारी कक्षास सील ठोकल्यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. याबाबत कृषी आयुक्तांना कळविण्यत आले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक तृप्‍ती सांडभोर यांनी परभणीत थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या सूचना दिल्‍या.

कर वसुलीसाठी मोहीम राबविण्‍यात येत आहे. महापालिकेचे वसुली पथक बीज परीक्षण प्रयोगशाळा येथे गेले असता मालमत्ताधारकाने थकीत कराच्या १० लाख ५७ हजार ५१४ रुपयांचा भरणा न केल्यामुळे नोटीस बजावण्‍यात आली.

Parbhani News
Agriculture Loan : थकीत कर्ज कमी करण्यावर ‘मध्यवर्ती’चा फोकस

पंरतु थकीत कराचा भरणा न केल्‍यामुळे सोमवारी (ता. २३) अधिकारी कक्ष सील करण्‍यात आला. सहायक आयुक्‍त जुबेर हाश्‍मी, कर निरीक्षक रमेश कोल्‍हे, वसुली लिपिक सुनील भराडे, अ. सत्‍तार, गजानन यादव, अ. हमीद, शेख नजीर यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com