
परभणी ः महाबीजच्या (Mahabeej) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) ३ हजार ३१८ बिजोत्पादक शेतकऱ्यांनी विविध पिकांचा ५ हजार १५९ हेक्टरवर बिजोत्पादन (Seed Production) कार्यक्रम घेतला आहे. सुमारे ७८ हजार ९३० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डि. डि. कान्हेड यांनी दिली.
महाबीजतर्फे परभणी विभागातील सहा जिल्ह्यामध्ये दरवर्षी रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या पायाभूत तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन तीन वर्षापासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे रब्बीमधील बिजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
यंदा विभागामध्ये हरभऱ्याचे २ हजार ४८२ शेतकऱ्यांनी ४ हजार ४ हेक्टरवर बिजोत्पादन घेतले असून ६७ हजार ४५२ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. ज्वारीचे ४८० शेतकऱ्यांनी ६०६ हेक्टरवर बिजोत्पादन घेतले असून ५ हजार ८७५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.
गव्हाचे ८४ शेतकऱ्यांनी ११८ हेक्टरवर बिजोत्पादन घेतले असून २ हजार ६४५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. करडईचे २३४ शेतकऱ्यांनी ३९१ हेक्टरवर बिजोत्पादन घेतले असून २ जार ७९५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. जवसाचे ३८ शेतकऱ्यांनी ४० हेक्टरवर बिजोत्पादन घेतले असून १६२ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, असे कान्हेड म्हणाले.
रब्बी बिजोत्पादन कार्यक्रम स्थिती
(हेक्टरमध्ये),बियाणे उत्पादन (क्विंटलमध्ये)
जिल्हा बिजोत्पादक संख्या क्षेत्र अपेक्षित बियाणे उत्पादन
परभणी ८४७ १३९४ २१७५५
हिंगोली ७७४ ९१८ १८०१०
नांदेड १९१ ३८१ ५११८
लातूर ६९८ ११५६ १६४६२
उस्मानाबाद ६२१ ८७५ १२७०२
सोलापूर १८७ ४३६ ४८८२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.