Seed To Harvest : ‘सीड टू हार्वेस्ट’ चांगली संकल्पना ः पवार

अॅग्रोकार्ट’द्वारे शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर सीड ते विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांसाठी ‘सीड टू हार्वेस्ट’ ही संकल्पना चांगली राबवीत आहेत.
Seed
Seed Agrowon

पुणे : ‘अॅग्रोकार्ट’द्वारे शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर सीड (Seed) ते विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांसाठी ‘सीड टू हार्वेस्ट’ (Seed To Harvest) ही संकल्पना चांगली राबवीत आहेत. त्याचा लाभ घ्यावा,’’ असे मत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar ) यांनी व्यक्त केले.

Seed
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

स्टार्टअप इंडिया, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खास शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या ग्रोझो संचालित ‘पूना ॲग्रोकार्ट’ या स्टार्टअपचे लोकार्पण रविवारी (ता. १३) खराडीत पूना अग्रोकार्ट येथे पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, ‘पूना अॅग्रोकार्ट’चे ‘सीईओ’ लंका शिवकुमार रेड्डी, वित्त विभागाचे प्रमुख किरण जाधव, विक्री विभागाचे प्रमुख मयूर झारखड, किरण दोंड, शाहू पवार आदी उपस्थित होते.

या स्टार्टअपशी १०० पेक्षा अधिक गावांतील १० हजार पेक्षा अधिक शेतकरी जोडलेले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ॲप’द्वारे शेतकऱ्याचा ताजा शेतमाल थेट ग्राहकांना पुरविला जातो. पवार म्हणाले, पूना अॅग्रोकार्ट ही एक नवीन संकल्पना सुरू होत आहे. शेतीमध्ये शेतकरी काबाडकष्ट करतो. परंतु त्याच्या मालाला चांगले पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचा माल ग्रेडिंग, पॅकिंग होऊन गुणवत्तेनुसार ग्राहकांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा होणार आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com