बाजार समितीतून बियाणे खरेदी केले नाही ः महाबीजचा दावा

महाबीज हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून राज्यातील शेतकऱ्यांना चार दशकांपासून गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत आहे.
बाजार समितीतून बियाणे खरेदी केले नाही ः महाबीजचा दावा
Bogus SeedsAgrowon

अकोला ः गेल्या दोन-तीन वर्षांत बियाण्याचा कितीही तुटवडा (Seed Shortage) निर्माण झाला तरी महाबीजने (Mahabeej) कधीही बाजार समितीमधून कुठल्याही प्रकारचे बियाणे खरेदी (Seed Procurement) केलेले नाही, असा दावा महाबीज प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी बियाणे महोत्सवाचे (Seed Festival) उद्‌घाटन केल्यानंतर अकोट येथे माध्यमांसोबत बोलताना महाबीज सारख्या संस्थेने दोन वर्षांपूर्वी बाजार समितीतून बियाणे खरेदी करून त्याची पॅकिंग करीत थेट विक्री केल्याचा आरोप केला होता.

श्री. कडू यांनी केलेले विधान पाहता, महाबीज प्रशासनाने कुठेही बियाणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून घेतले नसल्याचे म्हटले आहे. महाबीज हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून राज्यातील शेतकऱ्यांना चार दशकांपासून गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत आहे. महाबीजद्वारे बीजोत्पादक शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उत्पादित करण्याकरिता पायाभूत दर्जाचे स्रोत बियाणे पुरवठा केले जाते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीमध्ये पात्र झालेले मुख्यतः प्रमाणित बियाणेच विपणनाकरिता उपलब्ध करून देण्यात येते.

गत दोन-तीन वर्षांपासून महाबीजने आवश्यकतेनुसार बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन केले. परंतु सदर बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये नैसर्गिक व इतर कारणांमुळे बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. बियाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी महाबीजने उन्हाळी बीजोत्पादन कार्यक्रमसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर राबवला. परंतु सदर बीजोत्पादन कार्यक्रमातूनसुद्धा आवश्यकतेएवढे बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही, असेही महाबीजचे म्हणणे आहे.

खुल्या बाजारातून बियाणे खरेदी करण्याची महाबीजमध्ये अशी कुठलीही पद्धत नाही. शेतकरी बीजोत्पादकांच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून बियाणे तयार केल्या जाते. गेली चार दशके हा विश्‍वास कायम ठेवला आहे.
वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com