
बुलडाणा : कृषी विभाग (Agriculture Department) आणि ‘महाबीज’ (Mahabeej) यांच्यातर्फे कृषी उन्नती योजनेअंतर्गत (Krushi Unnati Yojana) बियाणे आणि लागवड साहित्य ग्रामबीजोत्पादन (Seed Production) कार्यक्रमात हरभरा, गहू या पिकांचे (Wheat Seed Subsidy) बियाणे अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये सन २०२२-२३ अंतर्गत हरभरा १० वर्षांवरील वाण ७ हजार ४५ क्विंटल व १० वर्षांआतील वाण ३ हजार ६०० क्विंटल याप्रमाणे एकूण १० हजार ६४५ क्विंटल हरभरा आणि गहू १० वर्षांवरील वाण ८८१ क्विंटल आणि १० वर्षांच्या आतील वाण ११९ क्विंटल, असे एकूण एक हजार क्विंटल बियाणे रब्बी हंगामामध्ये अधिकृत विक्रेत्यांमार्फत अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा काबुली वाण सोडून १० वर्षांच्या आतील वाणाचा दर ४५ रुपये प्रतिकिलो आणि १० वर्षांवरील वाणाच्या ३० किलो पॅकिंगच्या बियाण्यांसाठी ५० रुपये प्रतिकिलो व २० किलो पॅकिंगच्या बियाण्यांसाठी ५१ रुपये प्रतिकिलो, तसेच गहू १० वर्षांच्या आतील वाणासाठी २५ रुपये किलो व १० वर्षांवरील वाणासाठी २७ रुपये प्रति किलोप्रमाणे महाबीज बियाण्यांचे अनुदानित दर आहे.
शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज २१ ऑक्टोबरपर्यंत करावा लागणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधून अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे आणि महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक निकम यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.