घनकचरा, सांडपाणी आराखड्यासाठी १५ संस्थांची निवड

गावे कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी संस्थाची नेमणूक केली आहे.
Solid West
Solid WestAgrowon

पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी आता घनकचरा (Solid West) आणि सांडपाणी प्रकल्पाचा (Sewage) आराखडा तयार करण्यासाठी १५ संस्थांची निवड केली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांचा आराखडा तयार होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पांच्या कामाला आता गती येणार आहे.

Solid West
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

गावे कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी संस्थाची नेमणूक केली आहे.

Solid West
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

संस्थांना त्यांच्या अनुभवानुसार गावांचे वाटप करून त्यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. या आधारे गावांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता देऊन त्या आधारे निधी उपलब्ध करून कामे प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

ही कामे गतीने राबवून गावे कचरामुक्त करण्याचे नियोजन केले आहे. परंतु त्याला गावपातळीवरून प्रस्ताव पाठविण्यास प्रतिसाद मिळाला नाही. मोठ्या व शहरालगतच्या गावांमध्ये कचऱ्याची समस्या अतिशय गंभीर आहे. परंतु जागेचा अभाव आणि प्रतिसाद कमी मिळाल्याने निधी असून देखील प्रकल्प उभारणीला गती येऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेकडूनच आराखडा तयार केला जात असल्याने कामाला गती मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com