Jalyukt Shiwar Abhiyan : वाशीम जिल्ह्यातील १६६ गावांची ‘जलयुक्त’ अभियानात निवड

Agriculture Irrigation पीकवाढीच्या काळातच पावसाची अनियमितता आणि पावसाचा खंड यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो.
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon

Washim News : पीकवाढीच्या काळातच पावसाची अनियमितता आणि पावसाचा खंड यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो.

पावसाची अनिश्‍चितता लक्षात घेत ज्या गावांमध्ये जलसंधारणासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना, अर्थात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, अर्थात पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशा जिल्ह्यातील १६६ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्‍यात निवड करण्यात आली आहे.

जलशिवारचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १६६ गावांत वाशीम तालुक्यातील २६ गावे, रिसोड २१, मालेगाव २८, मंगरूळपीर २३, मानोरा ३३ आणि कारंजा तालुक्यातील ३५ गावांची निवड करण्यात आली आहे.

१६६ गावांच्या शाश्‍वत विकासासाठी जलसंधारणाचे यापूर्वी झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करणे, मूलस्थानी जलसंधारणाचे उपचार करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यासोबतच पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांच्या शाश्‍वत विकासाला हातभार लागण्यास जलयुक्त शिवार अभियानाची मदत होणार आहे.

Jalyukt Shiwar
Galyukta Shiwar Scheme : गाळ काढण्याचे काम वेगाने करा : जिल्हाधिकारी अरोरा

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करण्यास, विकेंद्रित जलसाठे निर्माण करून पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. मृद्‍ व जलसंधारणाची ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहे.

Jalyukt Shiwar
Jakyukt Shiwar Scam : ‘जलयुक्त’च्या चौकशीचे उपलोकायुक्तांचे आदेश

पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेसमोर मांडणार

पाण्याच्या ताळेबंदाचा लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेत शाश्‍वतता आणण्यासाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जलसंधारणाच्या समतल मशागत व उताराला आडवी पेरणी, आंतरपीक पद्धती/मिश्रपीक पद्धती, मृतसरी उघडणे/काढणे, रुंद वरंबा सरीपद्धतीने पेरणी, शून्य मशागत तंत्रज्ञान, हिरवळीचे खत, नॅडेप कंपोस्टिंग व गांडूळ खत इत्यादी माध्यमातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.

या अभियानात सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरावर भर देण्यात आला असून या गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामातून उपलब्ध झालेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना सामूहिक सिंचन सुविधेसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com