Beekeeping : हृषीकेश औताडे यांची ‘मधुमक्षिकापालन मास्टर ट्रेनर’ म्हणून निवड

भारत सरकारच्या पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे (सीबीआरटीआय) देशभरात शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिकापालन प्रशिक्षण आयोजन केले जाते.
Honey Bee
Honey BeeAgrowon

Beekeeping पुणे : भारत सरकारच्या पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे (सीबीआरटीआय) देशभरात शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिकापालन (Beekeeping Training) प्रशिक्षण आयोजन केले जाते.

त्याबरोबरच मधमाशी विषयाचे संशोधन (Bee Research) केले जाते. त्याचा विस्तार वाढावा म्हणून मधमाशीपालन व प्रशिक्षण विषयावर नैपुण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना ‘मधुमक्षिकापालन मास्टर ट्रेनर’ (Beekeeping Master Trainer) म्हणून निवड करून त्यांच्याद्वारे मधमाशीपालन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

त्याच धर्तीवर हृषीकेश औताडे यांना नुकतेच ‘मधुमक्षिकापालन मास्टर ट्रेनर’ म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.

Honey Bee
Beekeeping : मधमाशांसोबत मैत्रीने घडवला उद्योजक

गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून मधमाशी पालन विषयावर जनजागृती करत आहेत.

त्यांनी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतून एक महिन्याचे मधुमक्षिका पालन कोर्स, एक दिवसाचे मध तपासणी प्रशिक्षण तसेच, दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालय महाबळेश्‍वर येथून पूर्ण केले.

त्यांना शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात अकरा वर्षांचा अनुभव असून ते नेट प्राध्यापक परीक्षा उत्तीर्ण आहेत.

Honey Bee
Beekeeping : पर्यावरण रक्षणकर्ती

सध्या श्रीरामपूर (नगर) येथे गोदागिरी फार्म्स या कृषी स्टार्टअपचे ते संचालक असून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मधमाशी पेटी पुरवत आहे.

सेंद्रिय शेती, गांडूळ खत, अळिंबी उत्पादन व व्यवसाय व्यवस्थापन विषयावर व्याख्यानपर जागृती करत आहेत.

२५ प्रशिक्षणार्थी बॅचसाठी पाचदिवसीय मधुमक्षिकापालन प्रशिक्षण त्यांच्या गावांमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये व घराजवळच्या ठिकाणी आयोजित करावयाची असल्यास ११८० रुपये प्रति प्रशिक्षणार्थी फी पुण्यातील सीबीआरटीआय पुणे येथे भरावी.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राचा उपयोग शासनाच्या विविध योजना, त्या संदर्भातील संधी व व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना होईल.

प्रशिक्षणासाठी वरील फी व्यतिरिक्त इतर कोणताही खर्च येणार नाही. या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पुण्यात न जाता घराजवळ प्रशिक्षक उपलब्ध झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com