Sugarcane : पाटस येथे ऊस पिकांवर परिसंवाद

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कल्चर्ड क्रॉप फॉर्म समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील पाटस येथे ऊस पीक परिसंवाद व शिवारफेरीचे आयोजन शुक्रवारी (ता.८) करण्यात आले होते.
Sugarcane
SugarcaneAgrowon

पुणे : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (Agriculture Technology Management System) आणि कल्चर्ड क्रॉप फॉर्म समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील पाटस येथे ऊस पीक परिसंवाद (Sugarcane Crop Seminar) व शिवारफेरीचे आयोजन शुक्रवारी (ता.८) करण्यात आले होते.

कार्यक्रमप्रसंगी तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण भागवत, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप घोले, माऊली कापसे, राजेश थोरात, बाळासाहेब थोरात, उत्तम ताकवले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुपरकेन नर्सरीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, शुगर टेक्नॉलॉजिस्ट डॉ. मच्छिंद्र बोखारे, नेटाफेम इरिगेशनचे डॉ. अरुण देशमुख यांनी ऊस पिकाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी तर सूत्रसंचालन रितेश पोपळघट व आभार माऊली कापसे यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com