Sunil Kedar : आम्ही ज्येष्ठ नेते थोरातांसोबत

बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे वरिष्ठांना कळविले आहे.
Ex Minister Sunil Kedar
Ex Minister Sunil KedarAgrowon

Nana Patole Balasaheb Thorat News नागपूर ः पटोले आणि थोरात यांच्यावरून काँग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडल्याचे चित्र असताना बाळासाहेब (Balasaheb Thorat) ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, असे वक्तव्य करीत माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी अप्रत्यक्षरणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे वरिष्ठांना कळविले आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदाचाही राजीनामा त्यांनी दिला आहे. थोरात यांच्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत असून, केदार यांनी थोरातांची बाजू घेतल्याने विदर्भातून पटोले यांना विरोध असल्याचे दाखवून दिले.

Ex Minister Sunil Kedar
Indian Politics : राजकारण चालले कुठल्या दिशेला?

विशेष म्हणजे नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही केदार आणि विजय वडेट्‍टीवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आधीच महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला होता.

पटोले यांच्या विरोधात विदर्भातून काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्याचे कळते. यात विदर्भातील नेत्यांचाही समावेश असल्याचे समजते.

Ex Minister Sunil Kedar
Congress President: मल्लिकार्जुन खरगे कॉँग्रेसचे नवे अध्यक्ष

या संदर्भात पत्रकारांसोबत बोलताना केदार म्हणाले, की बाळासाहेब थोरात यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. राजकीय घडामोडींचे साक्षीदार आहेत. अनेक नेते इतर पक्षांत गेले. मात्र ते काँग्रेसमध्येच आहेत. त्यांचे नाराज होणे पक्षासाठी चांगले नाही.

पक्षातील कलह पक्षातच सुटावेत

पक्षातील कलह पक्षातच सुटले पाहिजे. काँग्रेस पक्षाला कोणी घरचा समजत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे जर नाना पटोले बोलले असतील, तर हा नियम सर्वांनाच लागू होतो, असा टोलाही केदार यांनी लगावला.

तुम्ही कितीही आकाशाला पोहोचला, मोठे नेते झाले असे समजत असाल, तरी थोरात साहेबांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आम्ही सांभाळू. केंद्रातील पक्षश्रेष्ठी हा प्रश्‍न निकाली काढतील. मात्र केंद्रातील नेत्यांची गरज भासायला नको, असेही केदार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com