Dr. Vijay Bhatkar : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर साधणार कृषी तज्ज्ञ, अभ्यासकांशी संवाद

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या सुवर्ण कृषी व ग्रामविकासाच्या उपक्रमांतर्गत संवादासाठी सोमवारी (ता. २६) डॉ. भटकर सोलापुरात येत असून, जिल्ह्यातील निमंत्रित कृषी तज्ज्ञ, अभ्यासकांशी ते संवाद साधणार आहेत
Dr. Vijay Bhatkar
Dr. Vijay BhatkarAgrowon

सोलापूर ः ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर (Dr. Vijay Bhatkar) यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या सुवर्ण कृषी व ग्रामविकासाच्या (Rural Development) उपक्रमांतर्गत संवादासाठी सोमवारी (ता. २६) डॉ. भटकर सोलापुरात येत असून, जिल्ह्यातील निमंत्रित कृषी तज्ज्ञ, अभ्यासकांशी ते संवाद साधणार आहेत.

Dr. Vijay Bhatkar
Agriculture Award : डॉ. सुरेंद्र काळबांडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार

हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता हा संवाद होईल. जिल्ह्यातील विधानसभा सदस्य, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, अभ्यासक असे निमंत्रित या वेळी उपस्थित राहतील.

Dr. Vijay Bhatkar
Agriculture Technology : शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची आवश्यकता

‘सकाळ आणि अॅग्रोवन’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय कर्ब वाढविणारे नैसर्गिक शेती तंत्रज्ञान, प्रिसिजन ड्रोन टेक्नॉलॉजीद्वारे शेती व्यवस्थापन, देशांतर्गत व निर्यातीसाठी कृषी शेतीमाल विक्री व्यवस्था, अल्प खर्चात इ.एम. द्रावणद्वारे नदी शुद्धीकरण, कारागृहातील कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांचे सुयोग्य नियोजन असलेले संतपीठ चिंतन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स- आगामी काळात भारतीय युवकांना कृषी क्षेत्रात असणाऱ्या संधी, विषमुक्त ऊस व इतर शेती अशा विविध विषयांवर हा संवाद होणार आहे. या संवादातूनच पुढे पंढरपुरात सर्वंकष असा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या संवादाला महत्त्व असणार आहे.

सुवर्ण कृषी व ग्रामविकासाचा नवा उपक्रम पंढरपुरात सुरू होणार आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, विक्रीव्यवस्था, जलव्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यावर या प्रकल्पात काम होणार आहे. त्यासाठी हे विचारमंथन महत्त्वाचे आहे.

- नानासाहेब कदम, राष्ट्रीय समन्वयक, सुवर्ण कृषी व ग्रामविकास प्रकल्प

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com