Kharip Crop : खरिपातही नावीन्यपूर्ण पिकांची कास

अमरावती विभागात २२,९४३ हेक्‍टरवर तीळ, मका लागवड
 Kharip Crop
Kharip CropAgrowon

अमरावती ः ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गंत नावीन्यपूर्ण पिकांच्या लागवडीला कृषी विभागाकडून २०२२-२३ या वर्षात प्रोत्साहन देण्यात आले. त्यामध्ये तीळ, तुती, मका (स्वीटकॉर्न) यांसारख्या व्यावसायिक व नगदी पिकांचा समावेश होता. २९,६१९ हेक्‍टर प्रस्तावीत क्षेत्रापैकी सुमारे २२,९४३ हेक्‍टरवर या पिकांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 Kharip Crop
Rabi Sowing : रब्बीत ४३ हजार हेक्‍टरवर नावीन्यपूर्ण पिकांची लागवड

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. खरिपात सोयाबीन, कपाशी ही पिके मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. यंदाच्या खरिपात या पिकांच्या जोडीला बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांनाही प्रोत्साहन देण्यावर कृषी विभागाने भर दिला होतो. ड्रॅगनफ्रुटला मागणी आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सुमारे २० हेक्‍टरवर याची लागवड प्रस्तावीत होती. त्यापैकी अवघा एक हेक्‍टरवर झाली. यवतमाळ जिल्ह्यात प्रस्तावीत १० हेक्‍टर इतकी लागवडदेखील झाली नाही.

 Kharip Crop
Kharip Crop: खरीप पिकांची काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

बुलडाणा जिल्ह्यात द्राक्ष १०० हेक्‍टरवर लागवडीचे नियोजन होते. त्याऐवजी ११६ हेक्‍टरवर लागवड झाली. अकोला जिल्ह्यात ८८० हेक्‍टर, बुलडाणा ३९१, अमरावती ६८३, यवतमाळ १५५, वाशीम ३२ हेक्‍टर याप्रमाणे केळी लागवड झाली आहे. हळदीखाली सर्वाधिक ६,१५२ हेक्‍टर क्षेत्र वाशीम जिल्ह्यात नोंदविण्यात आले. त्यानंतर ५३०० यवतमाळ, १५२४.५ बुलडाणा, तर ४८३ अमरावती आणि २१० हेक्‍टर अकोला जिल्ह्यात होते.

खरीप हंगामात बाजारपेठ असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देण्यात आला. त्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्याचा बराच अंशी परिणाम दिसून आला आहे.

- किसन मुळे,

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

खरिपातील नावीन्यपूर्ण पिके

प्रस्तावीत व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र

तीळ १३५० (६७१.६)

तुती १०६० (२६८.८)

१८० (८७.२)

ओवा ५८२ (२००)

ड्रगन फ्रूट ३२ (३)

आंबा ८५५ (७९१.३)

द्राक्ष १०० (१२६.४)

हळद १५६२० (१३६७०)

आले १८१० (९५३)

पानपिंपरी २८५ (२५०)

सफेद मुसळी ३५५ (२५७)

पेरू १६५० (११४३.५)

पपई ११६० (६०२)

सीताफळ २०२५ (१७७८)

केळी २५५५ (२१४१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com