विषारी मद्याने घेतले सातबळी

‘ड्राय’ राज्य असे बिरुद मिरविणाऱ्या बिहारमध्ये विषारी मद्यप्राशन केल्याने सातजणांचा मृत्यू झाला असून अन्य पंधराजण गंभीररीत्या आजारी पडले आहेत.
Bihar Toxic Liquor
Bihar Toxic LiquorAgrowon

‘ड्राय’ राज्य (Dry State Bihar) असे बिरुद मिरविणाऱ्या बिहारमध्ये विषारी मद्यप्राशन (Toxic Liquor Bihar) केल्याने सातजणांचा मृत्यू (Seven Dead Due To Toxic Liquor In Bihar) झाला असून अन्य पंधराजण गंभीररीत्या आजारी पडले आहेत. यातील काहीजणांनी दृष्टी देखील गमावली असल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या आजारी पडलेल्या नागरिकांनी नेमके कधी मद्यप्राशन केले? याबाबतची माहिती देण्यास त्यांचे कुटुंबीय टाळाटाळ करत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Bihar Toxic Liquor
Cotton : पेरा वाढूनही कपाशी बियाणे विक्रीला मर्यादा

प्रथमदर्शनी काही गावकऱ्यांनी हे विषारी मद्य पिल्याचे उघड झाले असून त्यातील पाचजणांचा येथे मृत्यू झाला असून अन्य दोघाजणांचा पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे. हे दोघेही गंभीररीत्या आजारी पडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी मेकर, मरहौरा आणि भेल्दी या पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये छापे घालायला सुरूवात केली होती.

Bihar Toxic Liquor
Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

या भागातील मद्य तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे. या प्रकरणी नेमकी किती लोकांना अटक करण्यात आली आहे? याबाबतची माहिती देण्यास पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. बिहारमध्ये विषारी मद्यप्राशन केल्याने ‘नोव्हेंबर-२०२१’ पासून आतापर्यंत पन्नासजणांचा मृत्यू झाला आहे.

प्रत्यक्षात आकडा मोठा

बऱ्याच ठिकाणांवर पोलिसांना न सांगताच अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याने प्रत्यक्षात मृतांचा आकडा खूप मोठा असू शकतो, अशी भीती आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. येथील स्थानिकांनी मंगळवारी रात्री मद्यप्राशन करायला सुरूवात केली होती, त्यांची पार्टी बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. याच पार्टीमध्ये त्यांना विषबाधा झाल्याचे स्थानिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नमूद केले.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केली त्यांच्यावर देखील कारवाई होईल.
अशोक चौधरी, मंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com