Jalgaon Dairy Election : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीसाठी सात मतदान केंद्रे

जळगाव : जिल्हा दूध संघाची निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १०) मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे असतील. एकूण ४४१ मतदार या केंद्रांवर मतदान करतील.
Milk Producers Union
Milk Producers UnionAgrowon

जळगाव : जिल्हा दूध संघाची निवडणुकीसाठी (Jalgaon Dairy Election) शनिवारी (ता. १०) मतदान (Election) होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे असतील. एकूण ४४१ मतदार या केंद्रांवर मतदान करतील. मतदान केंद्रात मतदानाची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Milk Producers Union
Jalgaon Dairy Election : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक २० डिसेंबरनंतर

मतदान केंद्रे व कंसात मतदारसंख्या अशी : अमळनेर, चोपडा तालुक्यांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदान केंद्र असेल (मतदार ७८), भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांसाठी भुसावळ येथील जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मतदान केंद्र असेल (४४)

Milk Producers Union
Jalgaon Dairy Election : अखेर निवडणुकीचा आखाडा तापला

चाळीसगाव तालुक्यासाठी चाळीसगावच्या न्यायालयासमोरील हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय (५९), एरंडोल, धरणगाव, पारोळा तालुक्यांसाठी एरंडोल येथील सूर्योदय ज्येष्ठ नगारिक बहुउद्देशीय संस्था, दत्त कॉलनी, सहा/क निबंधक यांचे कार्यालयासमोर (६७), रावेर, यावल तालुक्यांसाठी म्युनिसिपल हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज,

छत्री चौक, फैजपूर (ता. यावल) (६०), जळगाव, जामनेर तालुक्यांसाठी श्री सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी, रिंग रोड, जळगाव (५७), पाचोरा, भडगाव तालुक्यांसाठी श्री. गो. से. हायस्कूल, गिरड रोड, पाचोरा (७६). मतमोजणी रविवारी (ता. ११) श्री सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी, रिंग रोड, जळगाव येथे सकाळी आठला सुरू होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com