Saptishrungi Gad : सप्तशृंगी गडावर उभारणार स्वतंत्र पाणीयोजनेसह मलनिस्सारण केंद्र

पालकमंत्री दादा भुसे : विकास आराखडा बैठकीत निर्णय
Saptishrungi Gad
Saptishrungi GadAgrowon

नाशिक : श्री क्षेत्र सप्तशृंगी गड (Saptishrungi Gad) ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानावार आधारित विकास आराखडा सादर करावा. स्वतंत्र पाणीयोजना राबविण्यासह सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी मलनिस्सारण केंद्र आणि सुमारे दोन कोटी खर्चून नक्षत्र गार्डन उभारण्याचा निर्णय गुरुवारी (ता.३) पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Saptishrungi Gad
सानेन शेळीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार : सुनील केदार

पुढील महिनाभरात गडाच्या विकासाचा अंतिम स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे ठरले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आदींसह देवस्थान, ग्रामपंचायत, वन विभाग, वीजवितरण कंपनीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भुसे म्हणाले, की वणी विकास ग्रामपंचायत, आराखड्याबाबत देवस्थान, जिल्हा नियोजन समिती व वन विभागासह सर्वच यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजन करावे. त्यासाठी महिनाभरात अंतिम आराखडा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. विकासकामे करताना मलनिस्सारण उभारताना त्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर होईल, याचे नियोजन करावे. गडावर भाविकांच्या सुरक्षेसह पोलिस ठाणे, पाण्याची सोय, रस्ते विकास, गडासाठी स्वतंत्र मार्गाचे नियोजन करण्याची गरज त्यांनी मांडली.

Saptishrungi Gad
सप्तशृंग गडावर चैत्रोत्सव भाविकांविना साजरा

वन विभागाचा प्रतिनिधी घ्यावा’

विभागीय आयुक्त गमे यांनी सप्तशृंगगड देवस्थानावर स्थानिक ग्रामस्थांसह वन विभागाचा प्रतिनिधी घेण्याचे सुचविले. ते म्हणाले, ‘‘सगळ्यांची गडाची ४०० एकर जागा ज्या वन विभागाची आहे. तेथे रस्ते, वीज पाण्यापासून प्रत्येक कामासाठी वन विभागाकडे जायचे; पण गडावरील देवस्थान संस्थेवर मात्र वन विभागाचा एकही प्रतिनिधी नाही. तसेच ज्या गावात वणी गड आहे. तेथील ग्रामस्थांना देवस्थान विश्‍वस्तांवर घेण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तसेच धर्मादाय आयुक्तांकडे विनंती करण्याची गरज आहे,’’ असे सांगितले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com