Khed Sez : खेडमधील सेझ, पुनर्वसन बाधितांना न्याय मिळवून देऊ

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे काळूस येथील शेतकरी मेळाव्यात आश्‍वासन
Khed Sez
Khed Sez Agrowon

पुणे : सेझबाधित शेतकऱ्यांच्या ३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना संघटित करून हे प्रश्न आम्ही शासन दरबारी मांडणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर व्यापक अशी बैठक लावण्यासंदर्भात देखील निवेदन करणार आहोत. शासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलनाचे शस्त्र उभारून भविष्यात सर्व शेतकरी घेऊन मंत्रालयावर धडक मारणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी तेथे जमलेल्या शेतकऱ्यांना दिले.

खेड तालुक्यातील सेझबाधित शेतकरी तसेच आसखेड व चासकमान प्रकल्पामधील पुनर्वसन बाधित शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काळूस (ता. खेड) येथे रविवारी (ता.३०) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

Khed Sez
Crop Damage Survey : साहेब, पंचनाम्यासाठी पीक पाण्यात ठेऊ का ?

या मेळाव्यात रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, जालना जिल्हा अध्यक्ष गजानन राजबिंडे, जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, शेतकरी संघटना खेड तालुका अध्यक्ष सुभाषराव पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना वस्ताद दौंडकर आदी उपस्थित होते.

श्री खोत म्हणाले, की खेडमधील सेझबाधित शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. काळूस भागातील चासकमान पुनर्वसनांतर्गत टाकलेले सात बारावरील शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच, ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्ट्यातील भामा आसखेड पुनर्वसनांतर्गत टाकलेले शिक्के आजदेखील अनेक वर्षे संघर्ष करूनही काढण्यात आलेले नाहीत.

भामा आसखेड प्रकल्पामधील चुकीच्या धोरणामुळे पुनर्वसन क्षेत्राच्या नावाखाली तेथील बाधित शेतकऱ्यांना आजही सिंचनाची कोणतीच सुविधा मिळत नाही. परंतु कागदोपत्री असलेले आभासी लाभ क्षेत्र दाखवून त्याच्यावर अन्याय करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com