Farm Act : शेतकरीविरोधी कायद्यांच्या बेड्या तोडव्या लागेल : अमर हबीब

कवी इंद्रजित भालेराव यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त कार्यक्रम
Amar Habib
Amar HabibAgrowon

परभणी ः शेतकरी आणि स्त्रिया सर्जक आहेत. शेतकरी आणि स्त्रिया संपल्या तर जग नष्ट होईल. शेतकऱ्यांच्या दुर्दशेस कारणीभूत कमाल जमीनधारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे रद्द झाले (Anti-Farmer Laws)तर देशातील शेतकरी स्वतंत्र होतील. शेतकरीविरोधी कायद्याच्या बेड्या तोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब (Amar Habib) यांनी केले.

आहेर बोरगाव (ता. सेलू) येथे सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानतर्फे वाचन प्रेरणा दिन आणि कवी इंद्रजित भालेराव यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त बुधवारी (ता. १९) आयोजित अक्षर व्याख्यानमालेत ‘आता उठवू सारे रान’ या विषयावर ते बोलत होते.

Amar Habib
Crop Damage : मराठवाड्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

अध्यक्षस्थानी डॉ. विनायक कोठेकर, कृषिभूषण सूर्यकांत देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, राजेंद्र लहाने, सर्जेराव लहाने आदी उपस्थित होते. हबीब म्हणाले, की महात्मा जोतीराव फुले यांच्यानंतर शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला तात्त्विक अधिष्ठान दिले. शरद जोशी यांनी इंद्रजित भालेराव यांना शेतकऱ्यांचा महाकवी ही उपाधी दिली.

भालेराव यांचे शब्द शेतकरी आंदोलनाचे शब्द बनले आहेत. केवळ सातबारावर नाव असणारा नव्हे तर ज्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे तोच खरा शेतकरी आहे. प्रत्येक जाती धर्मातील शेतकरी आणि स्त्रियांची परिस्थिती वाईट आहे. सर्जक विरुद्ध बांडगुळ अशा संघर्षाविरुद्ध किसानपुत्रांनी एकत्र येऊन रान उठवावे लागेल.

भालेराव म्हणाले, की शेती आणि शेतकऱ्यांना दैवत मानतो. आयुष्यभर शेतकऱ्यांच्या कविता लिहिल्या. माझ्याबरोबर शेतकऱ्यांचा सन्मान झाला आनंदाची बाब आहे. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक ही कविता शेतकरी संघटनेचे घोषवाक्य झाली आहे. महात्मा फुले यांच्यानंतर मी कवितेत निर्मिक शब्द वापरला. यावेली ६० प्रयोगशील शेतकरी, शेतकरी महिलांचा भालेराव यांची पुस्तके, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com