शंकरराव गडाख राज्याचे नवे कृषिमंत्री

राज्यातील जनहिताची कामे अडकून न राहता ती सुरू राहावीत तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Shankarrao Gadakha
Shankarrao GadakhaAgrowon

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेतली आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केलेली नसली तरी त्यांची खाती काढून ती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. राज्यातील जनहिताची कामे अडकून न राहता ती सुरू राहावीत तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुवाहाटीला जाऊन बसलेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा कार्यभार जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakha) यांना सोपवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडात सामील असलेल्या एकूण १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुसऱ्या बाजुला बंडखोर गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राज्यातील सत्तानाट्याला वेगळे वळण मिळाले आहे. तर सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात शिवसेनेची बाजू लढवणारे मुख्य प्रवक्ते आणि खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्या ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. या पार्श्वभुमीवर गैरहजर असलेल्या पाच कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६ -अ मध्ये अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतिला आहे.

नगर जिल्ह्यातील अपक्ष आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakha) यांनी निवडून आल्यानंतर शिवसेनाला पाठिंबा दिला होता. त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री करून जलसंधारण खात्याची जबाबदारी दिली. गडाख यांच्याकडे आता दादा भुसे यांच्याकडील कृषी खाते सोपविण्यात आले आहे. तसेच दुसरे बंडखोर मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडील फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना ही खातीही गडाख यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे शेतीशी संबंधित कृषी, फलोत्पादन, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना अशी चारही खाती आता गडाख सांभाळतील.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादा दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन ही खाती शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खात्यांचे वाटपही इतरांकडे करण्यात आले.


शंभूराज देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (राज्य उत्पादन शुल्क), राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com