Sharad Pawar : पाडव्याला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे नागरिकांना भेटणार

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त बुधवारी (ता. २६) सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत गोविंदबाग येथे नागरिकांना भेटणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

बारामती, जि. पुणे ः ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त बुधवारी (ता. २६) सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत गोविंदबाग (Govind Baug) येथे नागरिकांना भेटणार आहेत.

Sharad Pawar
Ajit Pawar : ओला दुष्काळ जाहीर करा : पवार

दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेमध्ये या तीनही नेत्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असतो. कोविडच्या संकटांमध्ये या प्रथेवर मर्यादा आली होती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटणार आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवारांचं शेती क्षेत्रात योगदान आहे का ?

पाडव्याच्या निमित्ताने गोविंद बागेमध्ये दरवर्षी नागरिक या नेत्यांना भेटण्यासह इतर अनेक मित्र परिवाराला देखील भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. यंदा बारामतीच्या प्रथेनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी (ता. २६) संध्याकाळी पाच वाजता श्री महावीर भवन येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

आगामी वर्ष कसे असेल, या वर्षामध्ये काय उलाढाली होतील, पीक पाणी कसे असेल, तसेच बाजारपेठेची स्थिती कशी असेल, आंतरराष्ट्रीय बाजार कसा असेल, या बाबतचे सविस्तर मार्गदर्शन शरद पवार व्यापाऱ्यांना करतात. त्यामुळे व्यापारी देखील त्यांच्या या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com