Eknath Shinde : ‘पवार साहेब अधूनमधून फोन करून मार्गदर्शन करतात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हीएसआय’च्या (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची जाहीरपणे मुक्तकंठाने प्रशंसा केली.
Sharad Pawar Eknath Shinde
Sharad Pawar Eknath ShindeAgrowon

पुणे ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘व्हीएसआय’च्या (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) (Vasantdada Sugar Institue) व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीरपणे मुक्तकंठाने प्रशंसा केली.

‘मला पवार साहेब अधूनमधून फोन करीत मार्गदर्शन करतात. सहकारातील (Sharad Pawar's Contribution In Cooperative Sector) त्यांचे योगदान नाकारता येणार नाही,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सहकारातील उपस्थित रथीमहारथींना चकित केले.

पुण्यात यापूर्वी झालेल्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी, ‘अजितदादा आमच्या चांगल्या कामाला नेहमी पाठिंबा देतात,’ असे सांगितले होते.

त्यानंतर शनिवारी (ता. २१) ‘व्हीएसआय’च्या वार्षिक सभेत मुख्यमंत्र्यांनी थेट शरद पवार यांच्याशी असलेली सलगी जाहीर केली. ते म्हणाले, ‘शरद पवार आदरणीय व ज्येष्ठ नेते असून, त्यांच्या तोंडी नेहमी साखर असते.

ते अतिशय अनुभवी असून आम्हाला मार्गदर्शन करतात. देशात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.

सत्तेवर कोणता माणूस बसला आहे, हे बघता सामान्य माणसाच्या भल्यासाठी ते मार्गदर्शन करीत असतात.

मलाही ते अधूनमधून फोन करतात व मार्गदर्शन करतात. सहकारातील त्यांचे योगदान कधीही नाकारता येणार नाही.’

शरद पवार यांनी राज्य सरकारला मार्गदर्शन केल्यास ते चालू शकेल, असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘पवार हे देशाच्या कृषी क्षेत्राविषयी गाढा अभ्यास असलेले नेते आहेत.

शेती आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना जिव्हाळा, आत्मियता आहे. त्यांच्या अभ्यासाचा लाभ आपण करून घेतला पाहिजे. मी त्यांना विनंती करतो, की त्यांनी कृषी क्षेत्राला असेच मार्गदर्शन करीत राहावे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

यामुळे ‘व्हीएसआय’च्या आवारात जमलेले सर्व सहकार आणि राजकीय क्षेत्रातील नेते मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचीच चर्चा करीत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com