Sharad Pawar On Ajit Pawar : 'मी काय सांगतो ते महत्त्वाचं' ; अजित पवारांविषयीच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चां सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे
Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar Sharad PawarAgrowon

Maharashtra Politics Update :राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चां सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे.

एका इंग्रजी दैनिकाने रविवारी (ता.१६) दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता खुद्द शरद पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. (Ajit Pawar Latest News)

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्याच नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीची साथ सोडून अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या विचारात असल्याची बातमी 'द न्यू इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाने दिली होती. यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उद्ध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण

माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कोणाच्या मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षात काम करणारे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला मजबूत करण्याच्या भूमिकेत आहेत.

यापेक्षा दुसरा कुठलाच विचार कुणाच्याही मनात नाही. तसेच आमदारांची बैठक बोलवल्याच्याही बातम्या येत आहे, अशी आमदारांची कुठलीच बैठक बोलवली नाही, ही शंभर टक्के खोटी बातमी आहे, असल्याचे पवार म्हणाले.

Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar Latest : गारपिटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: अजित पवार

अजित पवारांसदर्भात सुरू असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे पवार यांनी थेटपणे सांगितले आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्यात होत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या तयारीची जबाबदारी दिली असून ते या कामांमध्ये व्यस्त असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बाहेर काय चर्चा होत आहे, याला मी महत्त्व देत नाही. पक्षाध्यक्ष म्हणून मी काय सांगतो ते महत्त्वाचं आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे हे विधान खूप काही सांगून जाणारे आहे. शरद पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे अजित पवार यांच्याविशयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का हे पाहावे लागेल.

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचीही बातमी आज चर्चेत आहे. यावर खुद्द अजित पवार यांनी अशा प्रकारचे काणतेही पत्र अस्तित्त्वात नसल्याचे दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com