शिंदे गटाचा 'धनुष्यबाणा'वर दावा

शिवसेनेचे बहुतांशी आमदार आपल्यासोबत असून आपला गटच मूळ शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही आपलाच हक्क रहावा, यासाठी शिंदे गटाने कायदेशीर संघर्षाची तयारी केली आहे.
Dhanushyban
DhanushybanAgrowon

शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा सांगितला असून त्यासाठी ते कायदेशीर लढाई लढणार असल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेचे बहुतांशी आमदार आपल्यासोबत असून आपला गटच मूळ शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही आपलाच हक्क रहावा, यासाठी शिंदे गटाने कायदेशीर संघर्षाची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांना भाजपकडून मदत केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

Dhanushyban
शिंदे गटासमोर विलीनीकरणाची अट: प्रकाश आंबेडकरांचा दावा

आपला गट हीच खरी शिवसेना (Shivsena)असल्याचा दावा शिंदे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात येते आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या वाटाघाटी केल्या जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदे यांच्याकडे जवळपास ४० हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडील आमदारांची संख्या सध्या तरी १५ वर थांबली आहे. त्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. शिंदे समर्थक आमदारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर चार अपक्षांसह ३४ आमदारांच्या सह्या होत्या. त्यानंतर जवळपास डझनभऱ आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आज दिवसभरात आणखी आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

Dhanushyban
महाराष्ट्राचं सोडा, पूरग्रस्त नागरिकांना मदत करा: ममता बॅनर्जींच्या आसाम सरकारला कानपिचक्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी गुरुवारी भावनिक आवाहन केले होते. त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. त्यांच्या आवाहनानंतरही काही आमदार, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. आता काही खासदारही शिंदे यांच्या सुरात सुर मिसळताना दिसत आहेत. शिंदे यांच्या आक्रमक पावित्र्याच्यावेळी सुरुवातीला ठाकरे यांच्यासोबत असणारे गुलाबराव पाटील, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाला मिळाले. त्या पाठोपाठ सदा सरवणकर, संतोष बांगर हे देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत.

ठाकरे यांच्याकडील संख्याबळ दिवसागणिक कमी होत चालले आहे. त्यांच्याकडे आता मोजकेच शिलेदार उरले आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उदय सामंत हे दोनच मंत्री आहेत. सुनील प्रभू, अजय चौधरी, भास्कर जाधव, नितीन देशमुख, कैलास पाटील (Kailash Patil), रविंद्र वायकर, सुनिल राऊत, वैभव नाईक, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, सुजित मिंचेकर, राजन साळवी व रमेश कोरगांवकर या आमदारांचा समावेश आहे.

शिंदे गटाकडून कैलास पाटील (Kailash Patil) हे आमदार ठाकरे यांच्याकडे परत आले आहेत. ठाकरे यांच्याकडे उरलेल्या पंधरा आमदारांपैकी आता कोणी शिंदे यांच्याकडे जाणार नाही, अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. शिंदे गटात गेलेल्या इतर आमदारांना परत आणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी टाकल्याचे समजते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com