Election Commission : निवडणूक आयोगा विरोधात शिवसेना दिल्ली उच्च न्यायालयात

नैसर्गिक न्यायाने निर्णय न झाल्याचे सांगत याचिका
Election Commission
Election CommissionAgrowon

मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) सुनावणी न घेताच चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे (Uddhav Thakrey) गटाने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी याचिका दाखल केली असून निवडणूक आयोगाने नैसर्गिक तत्त्व जपले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

Election Commission
Grampanchayat Election : धानोरा, सोमावल बुद्रूक ग्रामपंचायती बिनविरोध

मंगळवारी (ता. ११) या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. आमदार अपात्र ठरले तर आता जो घोळ निवडणूक आयोगाने घातला आहे,

Election Commission
Eknath Shinde : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित

तो कोण निस्तरणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय शनिवारी (ता. ८) रात्री घेण्यात आला. या निर्णयाआधी सुनावणी घेऊन शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्याचा संधी देण्याची गरज होती.

Election Commission
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

मात्र, तसे झाले नाही, असे अनिल देसाई यांनी याचिका दाखल केल्यानंतर सांगितले. काय आहे याचिका... निवडणूक आयोगाने नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ठाकरे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायांना संरक्षण मिळावे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्हे फ्री सिम्बॉल यादीत नाहीत. पण आम्हाला चिन्हे निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पर्याय दिले आहेत, त्यापैकी एक चिन्ह मिळावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com