Shivsena Crisis: शिवसेनेचा जिल्ह्यात स्वबळाचा नारा

जुन्नर तालुक्याच्या मेळाव्यात श्री. अहिर यांनी विधानसभेचा उमेदवार शिवसेनेचाच (Shivsena) असेल असे जाहीर करत स्वबळाचा नारा दिला आहे.
Shivsena
ShivsenaAgrowon

पुणे : जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते विजय शिवतरे (Vijay Shivatare), शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सोनवणे (Sharad Sonavane) हे शिंदे गटात डेरेदाखल झाल्यानंतर, शिवसेना संपर्क अभियानंतर्गत जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) यांनी जिल्हा पिंजुन काढत स्वबळावरचा नारा देत गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आ. अहिर आणि श्री. मिर्लेकर तीन दिवसांपासून तालुकानिहाय मेळावे घेत पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्नर तालुक्याच्या मेळाव्यात श्री. अहिर यांनी विधानसभेचा उमेदवार शिवसेनेचाच (Shivsena) असेल असे जाहीर करत स्वबळाचा नारा दिला आहे. अहिर यांच्यासह मिर्लेकर यांनी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांचे दौरे केले आहेत.

शुक्रवारी (ता.२२) सासवड येथे पुरंदर तालुक्याचा मेळावा झाला. या मेळाव्यात सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर व धनुष्यबाणासह लढेल. कट व गट करून राहीलेल्यांना एकवटलेले शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संपर्क प्रमुख अहिर यांनी दिला आहे. तर, ‘विजय शिवतारेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये आर्थिक घोटाळा झाला होता. वेळ आली तर या जलयुक्त घोटाळ्यामधील खेकडे पुन्हा शोधू’, असा इशारा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे दिला आहे.

माजी आमदार दांगट स्वगृही!

प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ठाकरे कौटुंबिक स्नेह असलेल्या दांगट कुटुंबातील बाळासाहेब दांगट हे जुन्नर मधुन सलग दोन वेळा आमदार होते. मात्र तिसऱ्या वेळी पराभवानंतर स्थानिक नेत्यांशी झालेल्या वादानंतर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये ते गेले होते. गेली १५ वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले बाळासाहेब दांगट यांनी बंधू बाजीराव दांगट यांच्या समवेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी (ता.२२) भेट घेतली. या भेटीनंतर दांगट शिवसेनेत सक्रिय होणार असल्याचे संकेत दिल्याने जुन्नर तालुक्यातील वातावरण ढवळुन निघाले आहे.

आदित्य ठाकरे लवकरच पुण्यात

पुणे जिल्ह्यातील ‘आपला भगवा, आपली शिवसेना’ अभियानानंतर युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा पुणे जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिली. या यात्रेदरम्यान विधानसभा मतदार संघानिहाय आढावा आणि मेळावे होणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com