विधानपरिषदः विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना- राष्ट्र्वादीत रस्सीखेच

विधानपरिषदेत शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. विरोधी पक्षांपैकी सर्वाधिक जागा असलयाचे सांगत शिवसेनेने (Shivsena) विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) विरोधी पक्षनेतेपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
Maharashtra Political News Updates | Maharashtra Legislative Council
Maharashtra Political News Updates | Maharashtra Legislative CouncilAgrowon

(वृत्तसंस्था):

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची वर्णी लागल्यांनंतर आता विधान परिषदेतील (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपद (LoP) कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस लागणार आहे. कारण या पदासाठी दोन्ही पक्षाकडून दावा सांगण्यात येत आहे.

विधानपरिषदेत शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. विरोधी पक्षांपैकी सर्वाधिक जागा असलयाचे सांगत शिवसेनेने (Shivsena) विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) विरोधी पक्षनेतेपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

Maharashtra Political News Updates | Maharashtra Legislative Council
Ajit Pawar : राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेत (Legislative Council) ११ सदस्य आहेत. पक्षाकडे वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेक अनुभवी सदस्य आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारखा अनुभवी सदस्य विरोधी पक्षनेतेपदी आल्यास खडसे भाजपवर जोरदार प्रहार करू शकतात. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीला देण्यात यावे, असा युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

महाराष्ट्र्र विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही असून लवकरच सेनेकडून या पदासाठीची नाव सभापतींकडे पाठवण्यात येणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे. आता आम्ही सत्ताधारी पक्ष नसून विरोधी पक्षात आहोत. परिषदेत आमचे १३ सदस्य आहेत. आम्हाला एका अपक्ष सदस्यांचे समर्थन आहे. विरोधी पक्षांपैकी सर्वाधिक सदस्य सेनेचे असल्याने हे पद आम्हालाच मिळायला हवे, असा दावा शिवसेनेचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला.

Maharashtra Political News Updates | Maharashtra Legislative Council
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि अनिल परब (Anil Parab) यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षाचे विधानसभा सदस्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता केवळ १५ सदस्य आहेत. त्यातही शिवसेनेच्या बहुतांशी खासदारांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याची तयारी केली आहे. अशा वेळी सरकारच्या धोरणावर टीका करण्यासाठी शिवसेनेकडे एखादे पद असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेनेने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी जोर लावला आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय असणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गेल्यामुळे वरच्या सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला देण्यात यावे, असा ठाकरे समर्थकांचा आग्रह आहे.

शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे आपण अजूनही शिवसेनेतच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या वाट्याला गेल्यावर तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदे शिवसेनेकडेच राहतील का, असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com