Desi Cotton Seed Shortage : देशी, सरळ कापूस वाणांची टंचाई वाढणार

Desi Cotton Seed : एका कंपनीकडून पुरवठ्याबाबत असमर्थता
 Cotton Seed
Cotton SeedAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : खानदेश व मराठवाड्यातील काही भागांत यंदा देशी संकरित (Desi Hybrid Cotton) किंवा देशी सुधारित, सरळ कापूस वाणांची (Desi Cotton) टंचाई वाढेल, असे दिसत आहे.

एका कंपनीने ऐन हंगामाच्या तोंडावर आपल्या देशी संकरित कापूस (Desi Hybrid Cotton) बियाण्याचा पुरवठा करण्याबाबत असमर्थता दाखविली आहे.

यामुळे देशी कापूस उत्पादकांसमोर अडचणी असतील व काळाबाजार वाढेल, असेही दिसत आहे.

खानदेशात एकूण सुमारे ४१ लाख पाकिटे कापूस बियाण्याचा पुरवठा विविध कंपन्या करतील. यात देशी सुधारित, देशी संकरित किंवा सरळ कापूस वाणांनाही चांगली मागणी असते.

कारण पीक जोमात येते. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अनेक शेतकरी साध्य करतात.

यामुळे देशी कापूस बियाण्याच्या सुमारे दीड ते पावणेदोन लाख पाकिटांची गरज असताना फक्त ५० ते ६० हजार पाकिटेच खानदेशात जूनच्या मध्यानंतर प्राप्त होतात.

 Cotton Seed
Cotton PA 837: देशी कापसाचा नवीन सरळ वाण

त्यांचा काळाबाजारही केला जातो. यात एका कंपनीने आपण देशी संकरित कापूस बियाण्याचा पुरवठा करू शकत नाही. अतिपाऊस व इतर समस्यांमुळे गुजरातमधील बीजोत्पादन कार्यक्रम अयशस्वी झाला.

यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार व जालना येथे आपण आपल्या देशी संकरित कापूस बियाण्याचा पुरवठा करू शकत नाही, असे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना नुकतेच दिले आहे.

 Cotton Seed
Desi Cotton Seed : देशी कापूस बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या परराज्यांत फेऱ्या

यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना देशी किंवा सरळ कापूस वाणांसाठी वणवण फिरावे लागेल, असे दिसत आहे.

ऐनवेळी कृषी विभाग देशी कापूस बियाणे कुठून मागविणार किंवा त्याचा अधिकृत पुरवठा कसा होईल, हादेखील मुद्दा आहे.

यामुळे देशी कापूस बियाण्याचा काळाबाजार वाढेल व शेतकऱ्यांची नाडवणूक होईल, असे दिसत आहे.

मध्य प्रदेशात तीन हजारांचे पाकीट
मध्य प्रदेशात देशी, सरळ कापूस बियाणे उपलब्ध झाले आहे. तेथेही त्याचा काळा बाजार सुरू आहे.

खानदेशातील शेतकऱ्यांना हे बियाणे अडीच ते तीन हजार रुपयांत तेथून आणावे लागत आहे. बडवानी, सेंधवा, बऱ्हाणपूर, हरदा, खंडवा या भागात खानदेशातील शेतकरी या बियाण्यासाठी सध्या जात आहेत.

तसेच नंदुरबारमधील अनेक शेतकरी गुजरातमधील निझर (जि. तापी) भागात वाका चाररस्ता, वेळदा व लगत या बियाण्यासाठी जात आहेत, अशी माहिती मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com