श्रीगुरू डॉ. तांबे यांचे अध्यात्म, आयुर्वेदात मोठे योगदान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मत; कार्ला येथे डॉ. तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण
Dr. Balaji Tambe
Dr. Balaji TambeAgrowon

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ‘संतुलन आयुर्वेद’ व ‘बालाजी तांबे फाउंडेशन’तर्फे आयोजित हा कार्यक्रम कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे झाला. त्या वेळी कोश्यारी बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, ‘बालाजी तांबे फाउंडेशन’च्या अध्यक्षा वीणा तांबे, ‘बालाजी तांबे हेल्थकेअर’च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मालविका तांबे, ‘संतुलन आयुर्वेद’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे, ‘संतुलन आयुर्वेद’चे जर्मनीतील व्यवस्थापकीय संचालक संजय तांबे उपस्थित होते. कोश्यारी म्हणाले, “मानवी शरीर हे फक्त भौतिक नाही. त्यात आत्मा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत १६ संस्कारांना महत्त्व दिले आहे.

Dr. Balaji Tambe
Cotton : खारपाण पट्ट्यात पावसाने कपाशीची वाढ खुंटलेलीच

आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये शरीरापेक्षाही अध्यात्माला जास्त महत्त्व दिले आहे. आयुर्वेदाचा थेट संबंध अध्यात्माशी आहे. हे सूत्र श्रीगुरू तांबे यांनी जाणले होते.” कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’बद्दल बोलताना कोश्यारी यांनी आत्मसंतुलनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “जीवनात आत्मसंतुलन महत्त्वाचे असते. चरक, सुश्रुत अशा ऋषींनी तपश्चर्या करून आयुर्वेद विकसित केले. हे ज्ञान समाजापर्यंत पोचविण्याचा संकल्प करणे, हाच खऱ्याअर्थाने श्रीगुरू तांबे यांचा वारसा पुढे घेऊन जाणे आहे. हिमालयातील ऋषीकेशसारख्या ठिकाणी असलेल्या आश्रमांमधून परदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. ते तेथे चार-चार ध्यानधारणा करतात. स्वित्झर्लंड, युक्रेन, रशिया अशा वेगवेगळ्या देशांमधून आलेले परदेशी स्त्री-पुरुष ध्यान करताना दिसतात. मानसिक शांततेसाठी आत्मसंतुलन हा एकच मार्ग आहे. आयुर्वेदाचे महत्त्व परदेशांमध्ये वाढत आहे.

Dr. Balaji Tambe
Fertilizer : ‘एक राष्ट्र एक खत’ धोरण केंद्राकडून लागू

भारतातील अनेक वैद्य ही उपचार पद्धती शिकून परदेशात प्रभावीपणे ती वापरत आहेत. मात्र आपल्याच देशात या उपचार पद्धतीकडे म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. संतुलित आणि सुदृढ जीवनशैलीसाठी आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म हे अतिशय महत्त्वाचे आहेत.’’ संजय तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मालविका तांबे यांनी केले, तर सुनील तांबे यांनी आभार मानले.

पुणे : ऊन-पावसाचा खेळ... सनईचे मंगल सूर... आकर्षक पुष्प सजावट... प्रसन्न आणि प्रत्येक मनाला ऊर्जा देणारे आश्वासक वातावरणात श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावर राज्याचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २५) झाले. कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. राज्यपाल कोश्यारी बरोबर सव्वाअकरा आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये दाखल झाले. त्यांचे वीणा तांबे, सुनील तांबे, डॉ. मालविका तांबे, संजय तांबे यांनी स्वागत केले. त्या वेळी श्रीगुरू तांबे यांच्या स्वरामधील स्तोत्राने वातावरण भक्तिमय झाले होते.

काही वर्षांपूर्वी मला डोकेदुखीचा त्रास व्हायचा. अनेक औषधोपचार करूनही तो काही कमी होत नव्हता. मात्र आयुर्वेदिक वैद्याने सांगितल्याप्रमाणे तंतोतंत उपचार घेतले आणि तो त्रास संपला. तसेच योगसाधनेमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचाही अनुभव मला आला. त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये येऊन इथे बोलू शकत आहे. -
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
श्रीगुरू तांबे हे व्यवसायाने आयुर्वेद तज्ज्ञ होते. ते शिक्षणाने अभियंता होते. त्यांचे वर्तन हे सामाजिक कार्यकर्त्याचे होते. इंद्रायणीकाठी असलेल्या या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये पाण्याची मोठी कमतरता होती. मात्र डॉ. तांबे यांच्या कार्यामुळे नंतरच्या काळात या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येत. यामुळेच इंद्रायणी काठचे हे स्थळ म्हणजे ‘बालाजीची आळंदी’ असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. -
श्रीनिवास पाटील, खासदार
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी मागील ४० वर्षांपासून योग, अध्यात्म, आयुर्वेद, पंचकर्म, वेद, आध्यात्मिक संगीत, संतुलन जीवन पद्धती आणि भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेस देश-विदेशात पोहोचवले आहे. आयुर्वेद या शास्त्राला प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचे ध्येय त्यांनी आयुष्यभर डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. त्यांनी शारीरिक स्वास्थ्यासोबतच आध्यात्मिक व मानसिक स्वास्थ्याला खूप महत्त्व दिले. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी लावलेला ‘संतुलन आयुर्वेद’ हा वटवृक्ष आहे. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर आम्ही त्यांचे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. -
डॉ. मालविका तांबे (एमडी आयुर्वेद) संचालक, बालाजी तांबे हेल्थकेअर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com