Siddheshwar Agriculture Exhibition : सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आज उद्‌घाटन

केंद्रीय रसायन, खत मंत्रालयाचे राज्यामंत्री भगवंत खुबांची उपस्थिती
agri exhibition
agri exhibition Agrowon

सोलापूर ः सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त (Siddheshwar Yatra) भरवण्यात येणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे (Siddheshwar Agriculture Exhibition) उद्‌घाटन गुरुवारी (ता. २९) सोलापुरात होणार असल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.

agri exhibition
Agriculture Exhibition : विद्यापिठातील कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

होम मैदानावर केंद्रीय रसायन, खते व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील. इंडीचे (कर्नाटक) आमदार यशवंत गौडा पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष काडादी यांनी केले आहे.

agri exhibition
Siddheshwar Factory : सिद्धेश्वर बचाव’साठी ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह मोर्चा

विविध माहिती, तंत्रज्ञानाचे स्टॅाल्स

प्रदर्शन २९ डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत सुरू राहणार असून, यामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिकापालन, व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे, बी-बियाणे, अवजारे, यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन, पॅकेजिंग व साठवणूक, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यूकल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य आदींचे सुमारे ३०० स्टॅाल असतील. दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा इथे पाहायला मिळेल.

तज्ज्ञांची व्याख्याने

या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आंबा सघन लागवड, माती आधारित व्हर्टिकल फार्मिंगचे महत्त्व, कृषी उत्पादन वाढीसाठी ड्रोनचा वापर, आधुनिक कृषी अवजारांचा वापर, उच्च तंत्रज्ञान आधारित फुलशेती, एकरी शंभर टन ऊस उत्पादन, कांदा लागवड व प्रक्रिया उद्योग, सोलार फार्मिंगचे महत्त्व यांसारख्या विषयांवर खास तज्ज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com