MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ

महात्मा फुले कृषी विद्यापीठ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पक्षिगणना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकूण ३ हजार १५८ पक्ष्यांची गणना केली.
MPKV, Rahuri
MPKV, Rahuri Agrowon

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV Rahuri) सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पक्षिगणना (Bird Census) करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकूण ३ हजार १५८ पक्ष्यांची गणना केली. खंड्या (किंगफिशर), मोर, चिमणी, कावळा, कोकीळ, पोपट, घार, तुतवार, साळुंकी, बुलबुल आदी पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ आढळली.

MPKV, Rahuri
MPKV, Rahuri : शेती उत्पन्न वाढीत शास्त्रज्ञांचाही हातभार

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाच चौरस किलोमीटर परिसरात ३२ विद्यार्थिनी, ४७ विद्यार्थी, ५ अध्यापक, अशा ८४ पक्षिप्रेमींनी १२ गटांतून पक्षिगणना केली. विद्यापीठ परिसरातील उपलब्ध फळबागा-पाणी, तसेच शिकारीवरील बंदीमुळे पक्ष्यांकरिता अभयारण्य ठरले आहे. येथे कावळे, चिमण्या, कोतवाल, चिरक, बुलबुल, भारद्वाज, पोपट, साळुंकी, तुतवार आदी पक्षी गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत.

MPKV, Rahuri
MPKV Rahuri Convocation: पहिल्यांदाच विद्येचा विद्यादंड महिला अधिकाऱ्याच्या हाती

धर्माडी टेकडी परिसर पोपट, मोर, कोतवाल, बुलबुल यांचे आश्रयस्थान आहे. मुळा कालव्याच्या भागात भल्या सकाळी भक्ष्य शोधणारा खंड्या पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अनेकांनी मोरांचे फोटो मोबाईलमध्ये टिपले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या पुढाकाराने अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात आहे. वृक्षांची संख्या वाढल्याने पक्ष्यांचाही अधिवास वाढला आहे. पक्षिगणनेतूनच हे स्पष्ट झाले आहे असे सांगण्यात आले.

गणनेचे वैशिष्ट्ये...

- मागील वर्षाच्या तुलनेत ४५० पक्षी जास्त आढळले.

- भारद्वाज पक्ष्यांची संख्या घटली.

- मोर, खंड्यासह (किंगफिशर) इतर पक्ष्यांची संख्या वाढली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com