Agriculture Education : कृषी शिक्षणक्रमात मुलींची दखलपात्र संख्या उज्ज्वल भविष्याची नांदी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचे विविध दाखले देत डॉ. गडाख यांनी शिकलेली स्त्री संपूर्ण कुटुंबाला पुढे नेण्यासाठी साह्यभूत ठरते हा आत्मविश्‍वास उपस्थितांमध्ये जागृत केला.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon

अकोला ः ‘‘आज कृषी शिक्षणक्रमात (Agriculture Education) मुलींची दखलपात्र संख्या वाढत असून, ही उज्ज्वल भविष्याची नांदी आहे,’’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले.

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Jayanti) यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संदीप तडस हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

Agriculture Education
Agriculture Education : शेती क्षेत्रातलं शिक्षण घेतल्यावर कोणत्या संधी आहेत ?

अध्यक्षीय मनोगतात डॉ. गडाख यांनी कृषी शिक्षणामध्ये मुलींनी घेतलेली भरारी मांडत फायद्याच्या शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या स्त्री वर्गाचा निर्णय क्षमतेत मोठा फायदा होणार असल्याने देशासाठी गौरवाची बाब असल्याचे सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचे विविध दाखले देत डॉ. गडाख यांनी शिकलेली स्त्री संपूर्ण कुटुंबाला पुढे नेण्यासाठी साह्यभूत ठरते हा आत्मविश्‍वास उपस्थितांमध्ये जागृत केला.

Agriculture Education
Girls Education : काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही!

प्रा. तडस यांनी जागतिकीकरणाच्या या स्पर्धात्मक युगात भारतीय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले मानाची स्थाने अभिमानास्पद असून, गतकाही दशकांमधील मुलींचा शिक्षण क्षेत्रासह व्यावसायिक तथा सामाजिक क्षेत्रातील दबदबा सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचीच पावती म्हणावी लागेल असे गौरवद्‍गार काढले.

शाळा गळती रोखण्यासाठी मध्यान्य भोजन, सत्यशोधक समाज, आंतरधर्मीय विवाह, अनाठाई रूढी-परंपरांच्या विरोधात दिलेला लढा प्रा. तडस यांनी मांडला.

प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. संदीप हाडोळे यांनी केले. विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता तथा संशोधन संचालक प्रा. डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता प्रा. डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव प्रा डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com