Catechu Industry : कात उद्योगासंदर्भातील वनखात्याच्या अटी सुलभ करा

कात उद्योगासाठी वनखात्याच्या जाचक अटी सुलभ कराव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी सावर्डे शेतकरी कात उत्पादक सहकारी संस्था मर्यादित सावर्डे यांच्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
Catechu Industry
Catechu IndustryAgrowon

चिपळूण (जि. रत्नागिरी) ः कात उद्योगासाठी (Catechu Industry) वनखात्याच्या जाचक अटी सुलभ कराव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी सावर्डे शेतकरी कात उत्पादक सहकारी संस्था मर्यादित सावर्डे यांच्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली.

Catechu Industry
Kokan Rivers : कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचनाच बदलली

मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी (ता. ३०) रत्नागिरी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्‍घाटन कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी आमदार निकम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिले.

Catechu Industry
Kokan Kapila : क्षण भाग्याचा.... कोकण कपिला गोसंवर्धनाचा...

निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकरी खैर या झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करत असून, त्यांच्या विनंतीचा विचार होऊन कात उद्योगांसदर्भात असलेल्या जाचक अटी शिथिल करण्यासंदर्भात शासनस्तरावर सकारात्मक धोरण व्हावे.

कात उद्योगासाठी लागणारा परवाना नूतनीकरण किंवा उद्योगातील नावात बदल करण्यासाठी सध्या कोल्हापूर कार्यालय किंवा काही प्रमाणात नागपूर कार्यालयापर्यंत जाऊन कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागत आहेत.

परमिट नूतनीकरणासाठी २०१७ पूर्वी अस्तित्वात असलेली वार्षिक नूतनीकरण पद्धत अंमलात आणावी म्हणजेच वर्षातून एकदाच परमिट नूतनीकरण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com