Arrest In Bribe
Arrest In BribeAgrowon

Arrest In Bribe : सिन्नर तालुका कृषी अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

सिन्नर येथे तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले अण्णासाहेब गागरे (वय ४२) यांच्याकडे निफाड तालुक्याचादेखील अतिरिक्त पदभार आहे.

Nashik News कृषी यंत्र व अवजारे उत्पादित करणाऱ्या कारखानदाराकडून त्याने शेतकऱ्यांना वितरित केलेल्या उत्पादनांवर शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी लाचेची (Bribe) मागणी करणारे सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे यांना शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५० हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

सिन्नर येथे तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले अण्णासाहेब गागरे (वय ४२) यांच्याकडे निफाड तालुक्याचादेखील अतिरिक्त पदभार आहे.

तक्रारदार यांचा सिन्नर एमआयडीसी येथे शेती यंत्र व अवजारे उत्पादित करण्याचा कारखाना आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या शेती यंत्र व अवजारांवर शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते.

Arrest In Bribe
Bribe News : संप काळातही लाचखोरी, नायब तहसीलदार अडकला

परंतु गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती दोन लाख रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यातील पहिला हफ्ता पन्नास हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी सायंकाळी गागरे यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.

Arrest In Bribe
Bribe News : संप काळातही लाचखोरी, नायब तहसीलदार अडकला

सायंकाळी सहा वाजेपर्यंत गागरे हे सिन्नर येथील कृषी विभागाच्या कार्यालयात त्यांच्या दालनात बसून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यातील कृषी अधिकारी व पर्यवेक्षकांची बैठक आटोपल्यानंतर ते बाहेर निघून गेले होते. सापळ्याची कारवाई झाल्याचे समजल्यावर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणालाही माहिती मिळत नव्हती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील, सहायक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com