यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू
Heavy RainAgrowon

यवतमाळ ः जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीज कोसळण्याच्या (Lightning) घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.१४) आणि बुधवारी (ता.१५) असे दोन दिवस वीज कोसळून तब्बल सहा जणांना आपला जीव गमवावा (Six Killed Due To Lightning) लागला. तर पाच जण जखमी झाले आहेत.

रोहिणी शंकर आगोसे (वय ८, रा. माळहिवरा, ता. दिग्रस) आणि पल्लवी दिलीप चव्हाण (वय १६, रा. इनापूर, ता. पुसद) अशी मृत मुलींची नावे आहेत. रोहिणी वडील शंकर आगोसे यांच्यासोबत शेतात गेली होती. वडील मशागत करीत असताना रोहिणी वखरावर बसून होती. त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रोहिणी पळत बाभळीच्या झाडाच्या दिशेने निघाली. झाडाखाली क्षणभर विसावताच त्याच झाडावर वीज कोसळली. त्यात रोहिणी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत बुधवारी साहेबराव कनिराम चव्हाण यांच्या शेतात कपाशी टोबणीचे काम सुरू होते. पल्लवी दिलीप चव्हाण, रेखा मधुकर राठोड, शांताबाई धर्मा चव्हाण, देवराव कनीराम चव्हाण, सविता अनिल चव्हाण हे सर्व कपाशी टोबणीच्या कामात व्यस्त होते. त्या वेळी वीज पल्लवीच्या अंगावर कोसळली. त्यात ती जागीच गतप्राण झाली. विशेष म्हणजे मंगळवारी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचे बळी गेले होते. त्यानंतर बुधवारीदेखील दोघांचा बळी गेला. त्यामुळे दोन दिवसांत विजेमुळे बळी गेलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com