Manipur Landslide : मणिपुरात दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू

जिरीबामपासून मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळपर्यंत नवीन लोहमार्ग बांधण्यात येत असून, या लोहमार्गाच्या संरक्षणासाठी प्रादेशिक सेनेची तुकडी तैनात करण्यात आली होती.
Manipur Landslide
Manipur LandslideAgrowon

इम्फाळ (वृत्तसंस्था) ः मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे (Heavy Rain Manipur) मोठी दरड कोसळून (Landslide MAnipur) किमान सहाजणांचा मृत्यू झाला. इतर अनेकजण बेपत्ता आहेत. तुपूल रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. लष्कराची एक तुकडी दरडीखाली गाडली गेली. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले ४५ जवान व नागरिकांच्या सुटकेसाठी मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे. खराब हवामानामुळे मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत १९ जणांना वाचविण्यात यश आले आहे. या ढिगाऱ्यामुळे इजेई नदीचा प्रवाह तुंबून नोनी जिल्हा मुख्यालयाचा सखल भाग जलमय होण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे.

जिरीबामपासून मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळपर्यंत नवीन लोहमार्ग बांधण्यात येत असून, या लोहमार्गाच्या संरक्षणासाठी प्रादेशिक सेनेची तुकडी तैनात करण्यात आली होती. या तुकडीवर दरड कोसळून जवान गाडले गेले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेनसिंह आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या दुर्घटनेबाबत माहिती घेतली. मुख्यमंत्री बीरेनसिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलाविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com