घोड धरणातून सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घेण्याचे आवाहन
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : जिल्ह्याच्या अनेक भागांत मागील काही दिवस जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. यामुळे चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून नदीपात्रात (Water Discharged From Dam) नुकतेच पाच हजार ९२० क्युसेकने पाणी घोड नदीत (Ghod River) सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.

Rain Update
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील आठ-दहा दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणांतून घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे घोड धरणात सुमारे ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Rain Update
Heavy Rain : अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

घोड धरणाची ४.८७ टीएमसी एवढी पाणीसाठा क्षमता आहे. त्यापैकी आत्तापर्यंत धरणात ३.७० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. अद्यापही वडज, येडगाव धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या दोन धरणांतून ज्याप्रमाणे पाणी सोडले जाईल त्याप्रमाणे घोड धरणामधून खाली नदीपात्रात पाणी सोडले जाईल. सध्या डाव्या कालव्याला २०० क्युसेकने, तर सांडव्याला ५ हजार ७२० एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. दरम्यान, घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र धरणातून पाणी सोडल्यामुळे आता काही प्रमाणात ऊस लागवडीला गती येईल.

आहुपे खोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. धरणामध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो. दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घ्यावी, असे आवाहन घोड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घोड धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ

घोड धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, धरणातील पाणीसाठवण क्षमता कमालीची कमी झाली आहे, असा अहवाल नाशिक येथील मेरी संस्थेने यापूर्वीच दिला आहे. मात्र गाळ काढण्याबाबत ठोस निर्णय होत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com