सहा गावांनी जपली मुळा नदीतील वाळू

नदीतील वाळूउपसा झाला तर पाणी पातळी खालावते आणि पर्यायाने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. मुळा नदीतील वाळू उपसा करण्याला ग्रामस्थांनी विरोध केला.
Sand Conservation
Sand ConservationAgrowon

नगर : नदीतील वाळूउपसा (Sand Extraction) झाला तर पाणी पातळी खालावते आणि पर्यायाने पाणी टंचाईला (Water Shortage) तोंड द्यावे लागते. मुळा नदीतील वाळू उपसा करण्याला ग्रामस्थांनी विरोध (Villagers Opposed To Sand Extraction) केला. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून नेवासा तालुक्यातील साधारण पाच ते सहा गावांनी आपल्या परिसरातील नदीतील वाळूची जपवणूक केली. दोन दिवसांपूर्वीही या गावांनी वाळू लिलावाला (Sand Auction) ग्रामसभा (Gramsabha) घेऊन विरोध केला आहे. साधारण पाच ते सात किलोमीटरच्या शिवारात वाळू उपसा होत नसलेल्या गावांत २५ वर्षांपासून दुष्काळही (Drought) दिसला नसल्याची स्थिती आहे.

Sand Conservation
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

नेवासा तालुक्यातील पानेगाव, करजगाव, अंमळनेर, निंभारीसह इतर गावे मुळानदीकाठी आहेत. मुळा नदीतील वाळू विक्रीसाठी प्रशासनाकडून लिलाव केला जातो. मात्र दरवर्षी ही गावे लिलावाला विरोध करतात. यंदाही दोन दिवसांपूर्वी लिलाव आयोजित केला होता. मात्र ग्रामसभा घेऊन या गावांनी लिलावाला विरोध केल्याने सध्या तरी प्रशासनाचा नाइलाज झाला आहे. मुळा नदीकाठच्या गावांनी चोरीच्या आणि अधिकृत सरकारी वाळू उपशाला विरोध करत गावांचे गावपण जपले आहे. वाळूउपसा होऊ न दिल्याने पाणी पातळी टिकून राहिली आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा अनुभव आहे.

Sand Conservation
Bogus Fertilizer : बनावट लेबल लावलेल्या दाणेदार खताच्या ३०० गोण्या जप्त

मागील आठवड्यात मुळा नदीकाठच्या गोणेगाव, निंभारी, पाचेगाव, खुपटी, चिंचबन व इमामपूर या गावांनी ग्रामसभा घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळू उपसा करण्याला विरोध करत वज्रमुट बांधली. या परिसरात साधारण २५ वर्षांपूर्वी वाळू लिलाव झाला होता. दरवर्षी लिलाव पुकारला जातो, मात्र ठेका घेऊनही वाळू काढता येत नसल्याने ठेकेदार लिलाव घ्यायलाच धजावत नाहीत.

दोन दिवसांपूर्वी लिलावातील दहा टक्के रक्कम गावच्या विकासाला देण्याची तयारी दर्शवत पानेगावांत प्रांताधिकारी, तहसीलदारांनी गावकऱ्यांना लिलाव होऊ देण्याची विनंती केली. मात्र गावकऱ्यांनी यंदाही वाळू उपसा करण्याला विरोध केला. प्रातांधिकारी, तहसीलदारांसह करजगावचे सरपंच विमल बर्डे, पानेगावचे सरपंच संजय जंगले, अंमळनेरचे सरपंच भारती घावटे, पोलिस पाटील अनिल माकोणे, बाबासाहेब जंगले, प्रकाश मोरे, सर्व गावांचे ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

परिसरातील गावांनी वाळू उपशाला विरोध केला. वाळूची जपवणूक केली. त्यामुळे इतर भागात दुष्काळ असला तरी आमच्या गावांत मात्र कधीच पाणी कमी पडले नाही. वाळू जपल्याचा हा परिणाम आहे.
संजय जंगले - पाटील, सरपंच, पानेगाव, ता. नेवासा
मुळाथडी परिसरात वाळू लिलावाला एकमुखी विरोध असतो. गावांतील राजकारण बाजूला ठेवून वाळू संवर्धन केल्याने पाणीपातळी टिकली. त्यामुळे दुष्काळ पडला नाही. विकासाला निधी देऊ असे प्रशासन म्हणतेय. मात्र सुनील गडाख यांनी मोठा निधी देऊन विकास केलाय. वाळू काढण्यासाठी गावकरी अजिबात तडजोड करणार नाहीत.
दीपाली नवगिरे, महिला शेतकरी, पानेगाव, ता, नेवासा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com