Sugarcane Crushing : मंगळवेढ्यात साडेसोळा लाख मे. टन उसाचे गाळप

ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख आहे. संत दामाजीपंतांनी दुष्काळग्रस्त व उपासमारीने त्रस्त झालेल्या जनतेला ज्वारीचे कोठार खुले केल्याचा इतिहासात दाखला आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

Sugarcane Crushing Season सलगर बुद्रूक : ज्वारीचे कोठार (Jowar Hub) म्हणून मंगळवेढ्याची ओळख आहे. संत दामाजीपंतांनी दुष्काळग्रस्त व उपासमारीने त्रस्त झालेल्या जनतेला ज्वारीचे कोठार खुले केल्याचा इतिहासात दाखला आहे.

पण अशा दुष्काळी (Drought) तालुक्यात यंदाच्या साखर हंगामात (Sugar Season) चार साखर कारखान्यांनी मिळून साडेसोळा लाखापेक्षा जास्त मेट्रिक टनाचे विक्रमी ऊस गाळप (Sugarcane Crushing) केले आहे. यातून सुमारे १६ लाख इतकी साखर पोती तयार झाली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून मंगळवेढ्याची ओळख आहे. त्याबरोबरच मंगळवेढ्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते.

अशा दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात पहिल्यांदा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निर्माण झाला व साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तालुक्याच्या दक्षिण टोकावर लवंगीच्या उजाड माळरानावर सावंत परिवाराने भैरवनाथ शुगरचे तीन नंबर युनिट काढले.

परिचारकांच्या कचरेवाडीचा युटोपियन शुगर तर बालाजी नगरचा आवताडे शुगर असे आणखी तीन खासगी साखर कारखाने मोठ्या हिमतीने साखर उद्योगात भरारी घेत आहेत.

Sugarcane Crushing
Sugarcane FRP : ‘एफआरपी’पोटी ४ हजार ६३० कोटी अदा

दरम्यान, परिचारकांचा युरोपियन शुगर तालुक्यात गाळपामध्ये आघाडीवर असून, पाच लाख मेट्रिक टन इतक्या उसाचे गाळप झाले आहे.

या गाळपामधून चार लाख ५० हजार इतकी साखर पोती निर्माण झाली आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरचा.

भैरवनाथने आतापर्यंत चार लाख सहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गाळपात भैरवनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतेच सत्ता परिवर्तन झालेल्या सहकारी तत्त्वावरच्या दामाजी शुगरचे तीन लाख ७२ हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे.

तर आवताडे यांच्या आवताडे शुगरने तीन लाख ८० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. एकूणच, चालू वर्षी मंगळवेढ्यातील चार साखर कारखान्यांनी मिळून सुमारे १६ लाख ५९ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप पूर्ण केले आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे

कर्नाटक राज्यातील उसाचा वाटा मोठा

दरम्यान, कर्नाटकातील सीमावर्ती भागातील मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी मंगळवेढ्यात आला आहे. यात विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील उसाचा मोठा वाटा आहे. पुढच्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठीच्या नोंदी या चारही साखर कारखान्यांकडे आहेत.

आठ-दहा दिवसांत होतील कारखाने बंद

दरम्यान, यंदाचा गाळप हंगाम संपत आला आहे. युटोपियन साखर कारखान्याने गाळप हंगामाची सांगता केली असून, बाकी तीन साखर कारखान्यांनी येत्या आठ- दहा दिवसांत कारखाने बंद होतील, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले..

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com