Rain Updates: भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साठ टक्के

अकोले तालुक्यातील पश्चिम दुर्गम भागात आठ दिवसांपासून धुवांधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. हरिश्चंद्रगड, कळसूबाई, घाटघर, रतनवाडी भागात जोरदार पावसामुळे काळ्या कातळावरून धबधबे ओसंडून वाहत आहेत.
Bhandardhara Dam
Bhandardhara DamAgrowon

नगरः जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भंडारदरा धरण गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंत ५९.३२ टक्के भरले आहे. निळवंडेत ६२ टक्के पाणीसाठा झाला असून, मुळा धरण ४५.७० टक्के भरले आहे.

चोवीस तासांत रतनवाडीला पावणे अकरा इंच, घाटघरला साडेदहा इंच, भंडारदऱ्याला १० इंच पावसाची नोंद झाली आहे. भीमा नदीतून सिद्धटेकजवळ ७४ हजार क्यूसेसने पाणी वाहत असल्याने तसेच नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ५८ हजार ६९७ क्यूसेसने विसर्ग सुरू असल्याने भीमा, गोदावरीला पूर (Flood)आला आहे. कुकडीतूनही पाच हजार क्यूसेसने पाणी वाहत आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिम दुर्गम भागात आठ दिवसांपासून धुवांधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. हरिश्चंद्रगड, कळसूबाई, घाटघर, रतनवाडी भागात जोरदार पावसामुळे काळ्या कातळावरून धबधबे ओसंडून वाहत आहेत.

आदिवासी पट्ट्यात मात्र शेतकऱ्यांचे जास्तीच्या पावसामुळे (Extremely Heavy Rain) नुकसान होत आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंत चोवीस तासांत घाटघरला २६८ मिलिमीटर, रतनवाडीला २६२ मिलिमीटर, वाकीला २३१ मिलिमीटर, भंडारदरा येथे २५२, निळवंडे येथे ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) चोवीस तासांत पाऊण टीएमसी, मुळात अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. मुळा नदी कोतुळजवळ ११ हजार १५२ क्यूसेसने मुळा धरणात पाणी येत असल्याने मुळाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. येडगाव धरणातून कुकडी नदीत २७०० क्यूसेसने पाणी सोडले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com