'अग्निपथ'विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक: २४ जूनला देशव्यापी निदर्शने

संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) समन्वय समितीच्या कर्नाल येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे टिकैत म्हणाले. सर्व राजकीय पक्ष, तरुणांनी, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या देशव्यापी निदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन टिकैत यांनी केले.
'अग्निपथ'विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक: २४ जूनला देशव्यापी निदर्शने
SKM MeetingAgrowon

केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' या लष्कर भरती प्रक्रियेविरुद्धचा तरुणांमधील रोष कमी झालेला नाही. 'अग्निपथ' भरती प्रक्रिया मागे घेण्यात यावी, यासाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे (SKM) २४ जून रोजी (शुक्रवारी) देशभरात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

भारतीय किसान युनियनचे (BKU) माजी नेते राकेश टिकैत यांनी ही घोषणा केली. संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) समन्वय समितीच्या कर्नाल येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे टिकैत म्हणाले. सर्व राजकीय पक्ष, तरुणांनी, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या देशव्यापी निदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन टिकैत यांनी केले.

भारतीय संरक्षण दलात भरतीसाठी 'अग्निपथ' ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. देशभरातील युवकांकडून विविध राज्यांत या प्रक्रियेविरोधात निदर्शने केली जात आहेत. या योजने अंतर्गत लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या युवकांना नियमित पेन्शन व सेवा सुविधा मिळणार नसल्याने युवकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

SKM Meeting
'अग्निपथ' योजनेविरुद्ध देशव्यापी आंदोलनाची गरज: टिकैत

या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना टिकैत यांनी अग्निपथ ही योजना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कामाची नसल्याचे स्पष्ट केले होते. चार वर्षांची सेवा संपवून बाहेर पडलेल्या या युवकांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करत असाच नियम लोकप्रतिनिधींनाही लागू करणार का? असा सवाल टिकैत यांनी केला होता. ज्याप्रमाणे कृषी कायद्याच्याविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात आले त्याप्रमाणेच 'अग्निपथ' विरोधात देशव्यापी आंदोलन उभारण्याची गरज टिकैत यांनी व्यक्त केली होती.

त्यानुसार संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) समन्वय समितीची बैठक कर्नाल येथे पार पडली. या बैठकीत २४ जून रोजी अग्निपथविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाकडून निदर्शनासाठी ३० जूनची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र आता ३० जूनऐवजी २४ जून रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

SKM Meeting
युवकांच्या संतापापुढे केंद्राचे डॅमेज कंट्रोल: गृह, संरक्षण मंत्रालयात अग्निविरांना आरक्षण

या निर्णयानुसार शुक्रवारी देशभरातील सर्व तालुके आणि जिल्हा कार्यालयांसमोर 'अग्निपथ'विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. राकेश टिकैत यांनी स्वतः ट्विट करून लष्करभरतीसठीच्या 'अग्निपथ' प्रक्रियेविरोधात ३० जूनऐवजी २४ जून रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com