Hawaman Andaz: किमान तापमानात काहीशी वाढ; पण गारठा कायम

उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानात (Minimum Temprature) काहीशी वाढ झाली असली तरी गारठा मात्र कायम आहे.

आज (ता. ५) उत्तर मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहून, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ

बुधवारी (ता. ४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि जळगाव येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.

तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २१ अंशांच्या दरम्यान होता. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी दोन दिवसांनी किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होत थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत आहेत.

Weather Update
Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ शक्‍य

राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी राज्याच्या कमाल तापमानात घट होत असल्याने दिसून येत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील राज्यात दाट धुके पसरले असून, महाराष्ट्रातही धुक्याची चादर अनुभवायला येत आहे. बुधवारी (ता. ४) विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते.

तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा भागात पावसाच्या सरी पडल्या.

दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याने बुधवारी (ता. ४) राजस्थानमधील चुरू येथे पारा शून्य अंशांच्याही खाली घसरल्याने देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ५) राजस्थानच्या काही भागात थंडीची तीव्र लाट, तर पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, चंडीगड, दिल्ली या राज्यांत थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राज्यात थंड दिवसदेखील अनुभवायला मिळणार आहे.

उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.


बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)

: पुणे ३०.८ (१३.८), जळगाव २७.८ (१०.५), धुळे २७ (७.६), कोल्हापूर २९.९ (१९.७), महाबळेश्‍वर २७.५ (१४.४), नाशिक ३०.४ (१३.२), निफाड ३०.२ (१०.६), सांगली ३०.२ (१९.८), सातारा ३०.५ (१७.४), सोलापूर ३४ (२०.३), सांताक्रूझ ३१ (१६.४), डहाणू २५.८ (१५), रत्नागिरी ३१.९ (१९.२), औरंगाबाद २९.८ (११.५),

नांदेड ३०.६ (१९.०), उस्मानाबाद - (१५.६), परभणी ३१.३ (१७.४), अकोला ३०.२ (१७.४), अमरावती २८.८ (१४.१), बुलडाणा २८.६ (१३.२), ब्रह्मपुरी २८.६ (१६.५), चंद्रपूर २८.६ (१८.४), गडचिरोली २८.६ (१५.४), गोंदिया २६.६ (१७.२), नागपूर २६.६ (१७.२), वर्धा २५.९ (१६), यवतमाळ २९.५ (१६.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com