Ganesh Utsav 2022 : गणेश सजावटीतून सामाजिक संदेश

आरेतील १२८८ एकर परिसरात पसरलेल्या घनदाट जंगलाच्या काही एकर परिसरात मेट्रोच्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली असल्याने येथील विविध प्रजातींचे पशू-पक्षी कमी झाल्याने बिबट्याला शिकार करण्यासाठी आदिवासी पाड्यात जावे लागते.
Gaensh Utsav 2022
Gaensh Utsav 2022Agrowon

घाटकोपर ः मुंबईतील थंडगार हवेचे ठिकाण व निसर्गसंपन्न असलेल्या, तसेच छोटा काश्मीर अशी ओळख असलेल्या गोरेगावमधील आरे मिल्क कॉलनी वाचवण्यासाठी मुंबईतील पर्यटन संस्था, सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षीयांकडून मुंबईत जोरदार आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने आरेतील कारशेडला स्थगिती दिली असताना आताच्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील स्थगित कारशेडचा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यात आल्‍याने आरेबाबत पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसम्राट श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बिबट्याची आत्मकथा चलचित्रातून मांडली आहे.

Gaensh Utsav 2022
Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा

आरेतील १२८८ एकर परिसरात पसरलेल्या घनदाट जंगलाच्या काही एकर परिसरात मेट्रोच्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली असल्याने येथील विविध प्रजातींचे पशू-पक्षी कमी झाल्याने बिबट्याला शिकार करण्यासाठी आदिवासी पाड्यात जावे लागते. त्यातून होणारे नुकसान बिबट्याच्या आत्मकथेतून मांडण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.

Gaensh Utsav 2022
Soybean Rate : यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

प्रभादेवी : कोरोनासारख्या महाभयंकर साथीचा आजार पसरला होता त्यावेळेस एक विठ्ठल पंढरीत, तर दुसरा लाखो लोकांचे प्राण वाचवत होता, असे वर्णन करणारा उद्धव ठाकरे यांचा फोटो घरगुती गणेश देखाव्यात वापरून त्यांच्या या धाडसाचे वर्णन करण्यात आले आहे.

प्रभादेवी येथील सारंग कुटुंबीयांनी पानांचा वापर करून पर्यावरणपूरक असा सुंदर देखावा तयार केला असून प्रत्येक पानांवर विठ्ठल अक्षर लिहून एका बाजूला विठ्ठलाचे भव्य पेंटिंग, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. उद्धव यांच्या फोटोखाली ‘लाखोंचे प्राण वाचवणारा विठ्ठल’ अशी उपमा त्यांना देण्यात आली आहे. सध्या प्रभादेवीमध्‍ये या देखाव्याची चर्चा होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com