पाच हजार गावांतील माती गुणधर्माचा होणार अभ्यास

पोकरा प्रकल्पांतर्गत राज्यातील पाच हजारांवर गावांचा समावेश आहे. या गावांतील मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्याचे अहवाल सादर करण्याचे काम एनबीएसस-एलयूपी या संस्थेला देण्यात आला आहे.
Soil
Soil Agrowon

नागपूर ः वातावरणातील बदलानुरूप पूरक पीक पद्धतीला (Crop Methods) प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बॅंकेच्या निधीतून पोकरा प्रकल्प (POCRA Project) राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत आता राज्यातील पाच हजार गावांमधील मातीच्या गुणधर्माचा (Soil Property) अभ्यास केला जाणार आहे. त्या आधारे त्या भागातील जमिनीत कोणते पीक फायदेशीर ठरेल, याची शिफारस केली जाईल. राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन वापर नियोजन या संस्थेतर्फे मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास होणार आहे.

राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन वापर नियोजन या संस्थेतर्फे देशभरात मातीच्या गुणधर्माच्या अभ्यासाचे काम होते. मातीच्या गुणधर्मांच्या माहितीचे अहवाल तयार करून ते राज्य सरकारला दिले जातात. प्रगत देशांप्रमाणे नजीकच्या काळात संस्थेतर्फे रिमोट सेन्सिंग प्रणालीचा वापरही या कामात सुरू झाला आहे. संस्थेतर्फे मातीचे नमुने घेत ते अभ्यासण्यात येतात. मातीचे विविध गुणधर्म असलेले थर, त्यांची पाणी धारण क्षमता, विविध पिकांची मुळे, त्याची रुजवणक्षमता या बाबींचा देखील अभ्यासामध्ये समावेश राहतो. त्याआधारे कोणत्या भागात कोणती पीक पद्धती उत्पादन आणि उत्पन्नक्षम ठरेल, याची शिफारस संस्था करते.

पोकरा प्रकल्पांतर्गत राज्यातील पाच हजारांवर गावांचा समावेश आहे. या गावांतील मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्याचे अहवाल सादर करण्याचे काम एनबीएसस-एलयूपी या संस्थेला देण्यात आला आहे. पोकरा आणि संबंधित संस्था यांच्या दरम्यान त्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. त्याआधारे या सर्व गावांचा स्वतंत्र पीक आराखडा तयार करण्यात येणार आहे.

पोकरा आणि नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे ॲण्ड लॅण्ड यूजिंग प्लॅनिंग संस्थेदरम्यान पाच हजार गावातील मातींचे गुणधर्म अभ्यासण्यासाठीचा करार करण्यात आला आहे. त्याआधारे संबंधित गावांमध्ये कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल, हे निश्‍चित करता येईल. त्याच पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आधी त्या पिकासाठी बाजारपेठ विकसित करणे गरजेचे आहे.
डॉ. बी. एस. द्विवेदी, संचालक, एनबीएसस-एलयूपी, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com