Crop Loan : सोलापूर जिल्हा बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांची मात्र उदासीनता कायम
 Crop Loan
Crop LoanAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) पीककर्ज (Crop Loan) वितरणातआर्थिकदृष्ट्या अडचणीच्या काळातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Solapur District Bank) सर्वाधिक ४५१ कोटी रुपयांचे वितरण करत, अन्य बँकांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. काही ठराविक बँका वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांकडून मात्र नेहमीप्रमाणेच उदासीनता दिसून येते आहे.

 Crop Loan
Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण अलीकडच्या दोन-तीन वर्षात खरीपातही मोठ्या प्रमाणात पिके घेतला जातात. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र सरासरी २ लाख ८९ हजार हेक्टर इतके आहे. पण यंदा तब्बल ३ लाख ५९ हजार हेक्टरवर पिके घेण्यात आली. यंदा पावसाने त्यात पिकांना मोठा फटका बसला. पण त्या आधीच शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात पीक कर्जाची मागणी नोंदली गेली आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यातील सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांना शेतीसाठी २०९९ कोटी ७१ लाख रुपयांच्या वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक ४५१ कोटी रुपयांचे वाटप करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे.  

 Crop Loan
Crop Loan : जिल्हा बॅंकेकडून रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात १०.२५ कोटींचे कर्जवाटप

दुसऱ्या स्थानावर बँक ऑफ इंडियाने ३३७ कोटी रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ३२९ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्राने १८९ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाने २६४ कोटी रुपये पीककर्ज वितरित केले आहे.

सोयाबीनचे क्षेत्र वाढले
खरिपामध्ये एरव्ही तूर, मूग, मटकी, उडीद अशी पिके व्हायची, पण अलीकडच्या दोन-तीन वर्षांत खरिपात या पिकांसह सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांत जवळपास ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन वाढले आहे. त्याशिवाय ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा ही पिकेही सर्रास घेतली जातात, त्यांनाही कर्जाची मोठी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com