
ग्रीन एनर्जी-क्लीन एनर्जीच्या क्षेत्रात राजस्थानला अग्रणी बनवण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री (Rajsthan cm) अशोक गहलोत (Ashok Gehalot) यांनी २०१९ मध्ये सौर ऊर्जा धोरण आखले. त्या धोरणानुसार राजस्थान सरकारने सौर ऊर्जा (Solar Energy) निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. सौर ऊर्जा उपकरणे बसवण्यावर भर देण्यात आला. त्यातून सध्या राजस्थानमध्ये १६६० मेगावॅट वीज सौर ऊर्जा निर्मिती करण्यात आहे.
राजस्थानचे ऊर्जामंत्री भंवर सिंह भाटी यांनी सांगितले की, "सौर ऊर्जाच्या क्षेत्रात मुख्यमंत्री गेहलोत यांनी देशातील एक महत्वपूर्ण मॉडेल म्हणून राजस्थानला ओळख मिळवून दिली आहे. राजस्थानमध्ये त्यामुळे १६ हजार ६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मित केली जात आहे."
तसेच ४ हजार ५७६ मेगावॅट वायुऊर्जा तर १२५ मेगावॅट बायोमास ऊर्जा तयार केली जात आहे. तसेच २४ मेगावॅट लहान स्वरूपाचे हायड्रॉ ऊर्जा निर्मित केली जात आहे, असंही भाटी म्हणाले.
देशातील सौर ऊर्जा निर्मितीत राजस्थान देशात अग्रस्थानी आहे. आणि अक्षय ऊर्जा निर्मितीच्या उद्देशासाठी राजस्थान महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्याशिवाय राजस्थानमधील जोधपुर येथील भडला येथे जगातील सर्वात मोठा २२४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे.
तसेच ९३५ मेगावॅट क्षमतेचा जैसलमेरमधील नोख येथे प्रकल्प निर्माण करण्यात आला. तर ७५० मेगावॅटचा क्षमतेचा सोलर पार्क फलोदी-पोखरण येथे तयार करण्यात आला आहे. ज्यातून सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे, अशी माहिती राजस्थानचे ऊर्जामंत्री भाटी यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.