Solar Energy : दिव्यांग सैनिकांसाठी सौरऊर्जा प्रशिक्षण अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सेवा’ अंतर्गत दिव्यांग सैनिकांसाठी सौरऊर्जा प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Solar Energy
Solar EnergyAgrowon

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे (Skill Development Center) ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सेवा’ अंतर्गत दिव्यांग सैनिकांसाठी सौरऊर्जा प्रशिक्षण (Solar Energy Training) अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम तीन महिने मुदतीचा आहे. त्या अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करणे याच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपन्या हे प्रशिक्षण देतील.

Solar Energy
Solar Farming : सौर शेतीत मोठी संधी

क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे कौशल्य विकास केंद्रातर्फे नुकताच या अभ्यासक्रमाचा एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे प्रारंभ करण्यात आला.

या वेळी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित, क्वीन मेरी टेक्निकल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल वसंत बल्लेवार, क्लीनमॅक्स एनर्जी एन्विरो कंपनीचे आंतरराष्ट्रीय प्रमुख धनंजय नांदेडकर, पनामा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल नलावडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अंजली जगताप-रामटेके, मधुसूदन शिंदे व सैनिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Solar Energy
Solar Energy Project : ‘म्हैसाळ’च्या सौरऊर्जा प्रकल्पास जर्मन बँकेचे कर्ज

डॉ. पंडित म्हणाले, “नवीकरणीय ऊर्जा ही काळाची गरज आहे. त्यामध्ये नोकरी व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा सैनिकांना आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नक्कीच उपयोग होईल.

या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षणावर भर न देता कार्यक्रमाचे स्वरूप व्यवसायाभिमुख असून, प्रात्यक्षिक कार्यावर जास्त भर असेल. या केंद्राद्वारे बायोएनर्जीवर आधारित कार्यक्रमदेखील आगामी काळात राबविला जाईल.”

कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com