Waste Water Management : घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे अवसरी खर्दमध्ये भूमिपूजन

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २३) आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे आणि सरपंच कमलेश शिंदे यांच्या हस्ते झाला.
Waste Water
Waste WaterAgrowon

Pune News मंचर, जि. पुणे ः आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे घनकचरा (Solid Waste) व सांडपाणी व्यवस्थापन (Waste Water Management) प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २३) आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे आणि सरपंच कमलेश शिंदे यांच्या हस्ते झाला.

आंबेगाव तालुक्यात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत २६ गावांमध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांचे उद्‌घाटन पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व हस्तांतर करण्यात आले.

Waste Water
Water Supply : बंदिस्त पाइपलाइनची चाचणी सुरू

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिलिंद टोणपे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी खुर्द, जवळे, पिंपळगाव खडकी, कारेगाव, थुगाव आदी २६ गावांत कार्यक्रम झाले.

Waste Water
Water Wastage : अमरावती धरणाच्या पाण्याची नासाडी

अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे तज्ज्ञ काळूराम डांगले, ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे सांडपाणी व्यवस्थापन तज्ज्ञ प्रवीण खंडागळे, धोंडिभाऊ महाराज शिंदे सदस्या सुवर्णा क्षीरसागर, प्रवीण भोर, वैभव वायाळ, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास भोर, दिनेश खेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी डांगले म्हणाले, ‘‘प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांवर भर द्यावा. जनजागृती करावी.’’

खंडागळे यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. राजू वायकर, महेश पोळ यांनी व्यवस्था पाहिली. स्नेहा टेमकर यांनी स्वागत केले. विजया राजू भोर यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com