Weed Management : तण व्यवस्थापनातील काही अनुभव...

मागील दोन वर्षांत मात्र शून्य मशागत आणि तण व्यवस्थापन या विषयाकडे शेतकरी स्वतःहून वळू लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाचे प्रयोग केले आहेत. या शेतकऱ्यांचे अनुभव आजच्या लेखामध्ये आपणापुढे मांडत आहे.
Weed Management
Weed ManagementAgrowon

शेतात तण (Weed) दिसले की काढून टाक, शेती तणमुक्त (Weed Free Farm) असली पाहिजे, तणे पिकांशी अन्नद्रव्ये (Nutrient), पाणी आणि काही वेळा सूर्यप्रकाशाशी स्पर्धा करतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन (Crop Production) घटते. महागडे रासायनिक व सेंद्रिय अन्नघटक तणांनी फस्त केल्यामुळे यावरील शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि अंतिमतः उत्पादन खर्चात वाढ होते.

Weed Management
Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

कृषी विद्यापीठाची अशी शिफारस आहे, की पहिल्या ४० ते ५० दिवसांत तणांचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे २५ ते ५० टक्के नुकसान होऊ शकते वगैरे वगैरे. यामुळे शेतकरी भांगलणी अगर निंदणी कामात हंगामात सतत गर्क असतो. हे झाले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तणाविषयी मत.

Weed Management
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

मी ३२ वर्षांपूर्वी ज्या वेळी भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली त्या वेळी असे लक्षात आले, की जमिनीतील सूक्ष्मजीवांनी पिकासाठी केलेल्या कामापोटी टाकलेला सेंद्रिय कर्ब संपून जातो. कुजणारा पदार्थ कुजविणारे जिवाणू त्यापासून सेंद्रिय खत तयार करतात, तर या सेंद्रिय खतांचा वापर करून दुसऱ्या गटातील जिवाणू पिकाला गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करतात.

Weed Management
Crop Management : शेती व्यवस्थापनाचे ऑनलाइन सल्ले उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर

पिकाचे पोषण व्यवस्थित होण्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त किती आणि कोणते खत दिले पाहिजे इतका मर्यादित विचार न करता ते पिकापर्यंत कसे पोहोचेल याबाबतही अभ्यास करणे गरजेचे आहे. या कामासाठी सूक्ष्मजीवाकडून सेंद्रिय कर्बाचा वापर होतो. तो जर गरजेपेक्षा कमी असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात खत टाकलेले असेल तरीही ते पिकापर्यंत पोचणार नाही आणि उत्पादन घटेल.

Weed Management
Cotton Crop Management : बोंड अळी नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

प्रचलित मार्गाने सेंद्रिय खताचा पुरवठा गरजेइतका कधीच करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी सोपे, स्वस्त व सुलभ असे नवीन मार्ग शोधणे सुरू झाले. वेगवेगळ्या प्रयोगातून असे लक्षात आले, की पिकाचे कापणीनंतर जमिनीखाली जे अवशेष शिल्लक राहतात ते कोणताही धक्का न लावता जमिनीत जसे वाढले तसेच ठेवले तर बाहेरून एक चिमूटभरही सेंद्रिय खत आणून टाकण्याची गरज नाही.

Weed Management
Grape Crop Insurance : द्राक्षासाठी विमा योजना

काही पिकांचे अवशेष आपोआप मरून जातात, तर काही पिकांचे कापणीनंतर सतत अवशेष फुटत असतात. असे अवशेष तणनाशकाने उभे आहेत तसेच मारले तर त्यांचेही खत होते. (उदा. ऊस, केळी) असे अवशेष मारल्यानंतर पुढील पिकाच्या वाढीत गरजेचे सेंद्रिय खत अगदी फुकटात मिळाल्याने पिकाचे उत्पादन २५ ते ५० टक्के सहज वाढते.

Weed Management
Grape Crop Insurance: द्राक्ष विमा योजनेचा लाभ कसा घ्याल ?

इतके सेंद्रिय खत व्यवस्थापन सोपे असता आज शेतकऱ्यांपुढे हा विषय अतिशय अवघड करून शिकविला जातो. हतबल शेतकरी सेंद्रिय खत न वापरण्याकडेच जास्त वळविला जातो, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.

Weed Management
Cotton Crop Management : बोंड अळी नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

तणांपासून सेंद्रिय खत ः

माझे शेतामध्ये जागेवरच सेंद्रिय खत उपलब्धतेचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढे हाच नियम शेतामध्ये आपोआप उगविणाऱ्या तणाला का लावू नये, असा विचार पुढे आला. यातूनच तणापासून सेंद्रिय खत तयार करण्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. हा अभ्यास चालू होऊनही आता एक तप होत आले आहे. सुरुवातीला शेतामध्ये तणे वाढविणे आणि योग्य वेळी तणनाशकाने मारणे हा विषय शेतकऱ्यांनी हसण्यावारी नेला.

पारंपरिक विचारसरणीच्या पूर्ण विरुद्ध विचारसरणी असल्याने हे स्वाभाविकच होते; परंतु जसजसे उत्पादन घटू लागले आणि शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ लागला तसे काही शेतकऱ्यांनी वरील प्रयोगांना जवळ करणे सुरू झाले.

सुरुवातीचा वेग अतिशय सावकाश होता. मागील दोन वर्षांत मात्र शून्य मशागत आणि तण व्यवस्थापन या विषयाकडे अनेक जण स्वतःहून वळू लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काही क्षेत्रावर तण व्यवस्थापन केले आहे. त्यांचे आणि काही जुने अनुभव आपणापुढे मांडत आहे.

ऊस पिकातील अनुभव ः

माझी १० आर जमीन थोडी बाजूला आहे. भात कापणी झाल्यानंतर त्यामध्ये मी उसाची रोपे लावून टाकली. काही कारणाने पुढे दोन महिने मला तिकडे जाता आले नाही. दोन महिन्यानंतर गेलो, तर संपूर्ण रान तणांनी भरून गेले होते. रोपे कोठेच दिसत नव्हती. तण थोडे बाजूला करून बघितले तर ऊस रोपे जिवंत होती.

तणांमुळे त्यांची वाढ खुंटली होती. प्रथम सर्व रान भांगलून काढावे असा विचार मनात आला; परंतु इतके वाढलेले तण उपटून काढण्यापेक्षा तणनाशकाने मारल्यास शेताला मुबलक खत मिळेल असा विचार मनात आला. तण जून झाल्याने मी ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर केला. मग पुढे तण कसे मारता येईल यावर चिंतन सुरू झाले.

मग रानात बसून रोपांभोवतीचे सर्व तण त्या त्या बाजूला हाताने जमिनीवर झोपविले आणि रोपावर शिफारशीत तणनाशक अजिबात न पाडता फवारणी केली. पुढे सर्व तण मरून गेले. आता रोपांना सूर्यप्रकाश मिळू लागल्याने त्यांनी वाढ सुरू झाली. वाढीचे दोन महिने फुकट गेल्याने उत्पादन फार मिळणार नाही असे गृहीत धरले होते.

पुढे तण मरून जागेला कुजू लागल्यानंतर उसाने जोमदार वाढ सुरू केली. अंतिम कारखान्याला ऊस गेल्यानंतर १० आरला १५ टन ऊस मिळाला. यापूर्वी इतके उत्पादन कधीच मिळाले नव्हते. (१० टनांच्या आसपास) वाढलेले पाच टन ही तणांची किमया होती. याचा अर्थ असा, दोन महिने फुकट गेले. त्याऐवजी सुरुवातीलाच तणनियंत्रण झाले असते तर इतके उत्पादन मिळाले नसते.

ज्वारी पिकातील अनुभव ः

मराठवाडा विभाग आणि सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारी खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसाळ्यात पाऊस हुकमी नसल्याने खरिपात शेतजमीन पड टाकली जाते. त्या शेतामध्ये तण वाढू नये म्हणून पेरणीपर्यंत पाच-सहा कुळवाच्या पाळ्या मारून रान स्वच्छ ठेवण्याची प्रथा आहे. एका दोन हेक्टर (दोन शेतकऱ्यांची जमीन) काही कारणाने पहिली कुळवाची पाळी चुकली आणि शेतामध्ये तण झाले.

तणांमुळे पुढे पाळ्या मारणे शक्य झाले नाही आणि शेत तणांनी भरून गेले. त्यांनी या वर्षीच्या पिकाची आशा सोडून दिली होती. मी त्यांना मोकळ्या शेतात ऑगस्ट महिन्यात ग्लायफोसेट अधिक २,-४ डी मारण्याचा सल्ला दिला. त्यानुरूप त्यांनी तणनाशकाची फवारणी केली. १५ दिवसांनी चुकलेले तण परत मारले. ऑक्टोबरपर्यंत शेतजमीन स्वच्छ झाली. पुढे योग्य वेळी तेथे ज्वारीची पेरणी केली.

बैलवाल्याने असे सांगितले, की माझे आयुष्य ज्वारी पेरण्यात गेले. इतकी चांगली पेरणी मला आयुष्यात भेटली नाही. पाळ्या मारून भुसभुशीत केलेल्या जमिनीपेक्षा तणे मारून तयार केलेल्या रानात जास्त चांगली पेरणी का होऊ शकली याचे शास्त्रीय कारण मी प्रत्यक्ष हे काम अनेक वर्षे केले असल्याने माझ्या लक्षात आले.

पुढे त्या शेतकऱ्यांनी ज्वारीची योग्य निगराणी केली. त्यांना आयुष्यात कधीच मिळाली नव्हती इतकी ज्वारी त्या वर्षी मिळाली. अपघाताने मिळालेल्या या अनुभवातून ते शेतकरी काहीच शिकले नाहीत. पुढील वर्षी नेहमीप्रमाणे कुळवाच्या पाळ्या मारून जमीन स्वच्छ ठेवली, याला काय म्हणावे?

कोरडवाहू कापूस, तूर ः

मराठवाड्यात कापूस आणि तूर ही लांब अंतरावरील तसेच लांब मुदतीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. बरेच क्षेत्र कोरडवाहू आहे. दोन पिकांच्या ओळीत मूग, उडीद अगर सोयाबीन ही अल्प मुदतीची पिके घेण्याची प्रथा आहे. अशा पेरणीसाठी १०० टक्के जमिनीची पूर्वमशागत, डवरणी अगर कोळपणी व भांगलणी करावी लागते.

अल्प मुदतीचे पीक निघाल्यानंतर मधली जमीन उघडी होते. पुढे वाळून भेगा पडू लागतात. भेगा मुजविण्यासाठी सतत कोळपणी करावी लागते. दोन पावसाच्या सत्रात अंतर पडले तर पीक वाळते. पाऊस लवकर गेल्यास मुख्य पिकाचे उत्पादन सुमार मिळते.

मी त्यांना मिश्र पिकाऐवजी मुख्य पिकाला त्रास होणार नाही असे मधल्या पट्ट्यात तण वाढविण्यास सांगितले. मधल्या पट्ट्यात सुरुवातीला १.५ ते २ महिने तण वाढवायचे आणि पुढे उलट्या वखराने झोपवून तणनाशकाने मारून टाकायचे. जमिनीखाली त्या तणाच्या जाळ्यात इतके पाणी साठविले जाते की,

पाऊस गेल्यानंतर पुढे दोन महिने त्यातील ओलाव्यावर पीक आरामात वाढते. यामुळे ही दीर्घ मुदतीच्या पिकाचे पूर्ण क्षमतेने पीक घेता येते. कोणताही खर्च न करता कोरडवाहू पिकाला संरक्षित पाणी मिळते. पुढील वर्षी तणाच्या पट्ट्यात पीक व पिकाच्या पट्ट्यात तण असा पद्धतीने फुकटात जमीन सुपीक होते. त्या शेतकऱ्याच्या पीक उत्पादनात चांगली वाढ मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com