Agriculture Electricity : दिवसभर राबा, रात्री पाण्यासाठी जागा

रब्बी हंगामात पिकांचे सिंचन करावे लागत असून सर्वत्र विजेची मागणी वाढलेली आहे.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

अकोला ः रब्बी हंगामात (Rabi Season) पिकांचे सिंचन (Irrigation) करावे लागत असून सर्वत्र विजेची मागणी (Electricity Demand) वाढलेली आहे. वीज कंपनीकडून वीज वितरणाचे वेळापत्रक कधी दिवसा, तर कधी रात्रीचे असल्याने मोठी ओढाताण होत आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे बदला, नवी वीजजोडणी द्या

रात्रीचा वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. दिवसभर राबल्यानंतर रात्री विजेमुळे जागरणाचा बाका प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे. सध्या अनेक शेतशिवारात शेतकरी जागरण करताना दिसून येत आहेत.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : शेतीला दिवसा चार तासच वीजपुरवठा

सध्या रब्बी पिकांची लागवड सर्वत्र झालेली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. गहू, हरभरा व इतर पिकांची ही वाढीची अवस्था आहे. अशा काळात पिकाला पाण्याचा ताण परवडणारा नसतो. त्यातच सध्या थंडीचा प्रकोपही वाढलेला आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देणार

विजेचा पुरवठा आठवड्यात काही दिवस दिवसाला आणि काही दिवस रात्रीला राहतो. रात्रीचा पुरवठा गावांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार केला जातो. अनेक गावांमध्ये तर मध्यरात्रीनंतर सुरू होऊन सकाळी बंद केला जातो. मध्यरात्री वीज येणार असल्याने शेतकऱ्यांना जागरणाशिवाय कुठला दुसरा पर्याय नाही.

गेल्या काही वर्षात जंगलांना लागून नसलेल्या शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढलेले आहे. बिबट, रानडुकरांचे हल्ले सातत्याने सुरू असतात. अशावेळी सिंचनासाठी रात्रीला जाणारा शेतकरी जीव धोक्यात घालून हे काम करीत आहे.

सवणा (ता. चिखली) परिसरात दिवसाची पाळी ही सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत आहे. रात्रीची पाळी ही १०.५० ते सकाळी ६.५० अशी आहे. दिवसाच्या वेळी नियोजन करणे सोपे जाते. चार ते सहा तासांचा स्प्रिंकलरचा एक टप्पा राहतो. ही वेळ झाली की लगेच दुसरा टप्पा येतो. पण पुरेशी वीज नसल्याने काही वेळेस एका दिवशी दोन किंवा दोन दिवसांमिळून तीन टप्पे होतात. रात्री हे पाइप बदलण्याचे काम कठीण आहे.
मोहन जगताप, शेतकरी
तेल्हारा तालुक्यात माळेगाव फिडरवर रात्री ११.१० वाजता पुरवठा सुरू होऊन सकाळी ७.१० वाजता बंद होतो. शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत शेतात राहावे लागते. तर, दुसरा टप्पा चार तासांनी बदलण्यासाठी पुन्हा पहाटे तीन वाजता जावे लागते.
प्रमोद गावंडे, शेतकरी
जानेफळ या आमच्या भागात दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत वीज राहते. त्यात एक दोन वेळा पुरवठा सुरू बंद होतो. मोठ्या कसरतीने स्प्रिकंलरचा एक टप्पा होतो. ओलिताचे काम विजेअभावी दहा बारा दिवस चालते.
रमेश निकस, शेतकरी
आमच्या भागात मेडशी मालेगाव सबस्टेशन ४८ तासांत १६ तास एकसारखा वीजपुरवठा देते. पण वीज एकसारखी मिळत नाही. १६ तास वीज दिल्यामुळे खोळंबा होत आहे. दिवसा १२ तास वीज मिळायला हवी.
विनोद पाटील, शेतकरी
आमच्याकडे रात्री १२.४५ वाजता पुरवठा सुरू होऊन सकाळी ८.४५ पर्यंत सुरू राहतो.आठवड्यातील चार दिवस असे शेड्यूल असते. इतर दिवशी सकाळी ८.४५ ते दुपारी ४.४५ अशी तीन दिवस वीज मिळते.
शंकर दांडे, दहिगाव, ता. नांदुरा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com